शासकीय नियमानुसार परळी नगर परिषदेने कत्तलखान्यांना परवानगी देण्याची कुरेशी संघटनेची मागणी

शासकीय नियमानुसार परळी नगर परिषदेने कत्तलखान्यांना परवानगी देण्याची कुरेशी संघटनेची मागणी 

परळी प्रतिनीधी.    राज्य शासनाच्या कायदेशीर नियमानुसार परळी शहरात कत्तलखान्यांना परवानगी देण्याची मागणी कुरेशी संघटनेच्या वतीने परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    याबाबत नुकतेच काल दिनांक 4 जुलै रोजी कुरेशी  संघटनेच्या वतीने परळी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या भागात पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या जनावरांच्या यामध्ये म्हैस, रेडा, शेळी, मेंढी कत्तल्लीचे कायदेशीरपणे लघु कत्तलखाने सुरू करण्याचे परवानगी देण्यात यावी. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग यांच्या 22 जुलै 2014 च्या परिपत्रकानुसार ज्या गावांमध्ये 9  किंवा त्यापेक्षा कमी जनावरांची दररोज कत्तल होते. तेथे मॉडर्न स्लाटर हाऊसचे गरज नाही. तसेच प्रदूषण कंट्रोल बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्राचे ही आवश्यकता नाही. अशा ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परवानगीने  पारंपारिक लघुकत्तलखाने सुरू करता येऊ शकतात. तसेच त्या ठिकाणी स्थानिक
स्वराज्य संस्थेने जनतेचे आरोग्य स्वच्छता आणि जनावरांच्या कत्तलीसंदर्भात   आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. 
   गेल्या काही वर्षापासून आमच्या व्यवसायाला बेकायदेशीर समजून अडथळे निर्माण केले जात आहेत. तरी वस्तुस्थिती आणि शासनाच्या नियमांचा वापर करून एक छोट्या स्वरूपाचा लघुकत्तरखाना सुरू करण्यास परळी नगर परिषदेने परवानगी द्यावी जेणेकरून आरोग्य विषयक नियमांचे पालन होईल व व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही. यासाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची विनंती कुरेशी  संघटनेने केली आहे.
    या निवेदनावर कुरेशी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष कादर कुरेशी, परळी अध्यक्ष महबूब कुरेशी, परळी तालुका अध्यक्ष फैजल कुरेशी, यांच्यासह आलीशेर  कुरेशी, जामीन रशीद कुरेशी, निसार कुरेशी, अफरोज कुरेशी, शहबाज कुरेशी, तारेख कुरेशी, मुखेद कुरेशी, शहनवाज कुरेशी, ताहेर कुरेशी, मुजफ्फर कुरेशी आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने