व्यसनाचा शेवट विनाशाकडे जातो, त्यामुळे तरुणांनी व्यसनमुक्त राहण्याची गरज - पो. नि. धनंजय ढोणे

व्यसनाचा शेवट विनाशाकडे जातो, त्यामुळे तरुणांनी व्यसनमुक्त राहण्याची गरज - पो. नि. धनंजय ढोणे

परळी प्रतिनिधी.    कोणत्याही व्यसनाचा शेवट हा विनाशाकडे जातो तसेच स्वतःबरोबर कुटुंबाचेही प्रचंड नुकसान होते. या संकटातून बाहेर येण्यासाठी तरुणांनी व्यसनमुक्त राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी केले. ते परळीतील सिद्धार्थ नगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. 
    सिद्धार्थ नगर येथील त्रिशरण बुद्ध विहारात दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7  वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ माधवराव ताटे हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक डी.जी.मस्के, पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, पत्रकार वैजनाथ गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संजय मस्के, संयोजक गौतम साळवे आदी उपस्थित होते. 
    यावेळी पुढे बोलतांना पो.नि.धनंजय ढोणे म्हणाले की, आजचा तरुण हा उद्याचा देशाचा आधारस्तंभ आहे. तो आधारस्तंभ डळमळीत असेल, व्यसनात गुंतलेला असेल तर स्वतःचे तर नुकसान होतेच होते शिवाय त्याच्या कुटुंबाचेही अतोनात नुकसान होते. आपला मुलगा काय करतो? काय नाही? याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तरुणांना उद्देशून बोलताना पुढे ते म्हणाले की मित्र जोडताना ते कसे आहेत? त्यांच्या सवय काय? त्यांना कोणते व्यसन आहे का? याचाही युवकांनी अभ्यास केला पाहिजे. वाईट मित्रांपेक्षा चांगले मित्र जोडा असे आवाहनही त्यांनी केले.
    याप्रसंगी माधवराव ताटे,डी .डी.जी.मस्के,मिलिंदराव घाडगे वैजनाथ गायकवाड, यांनी आपले विचार मांडले. तर नुकताच समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माधवराव ताटे यांचा तर महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार वैजनाथ गायकवाड यांचा सिद्धार्थनगर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवर पाहुण्यांचे हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
   या कार्यक्रमास विजय हजारे,कैलास तरकसे, सिद्धार्थ साळवे, अनिल सोनवणे, विकास गायकवाड,राम मुंडे, समाधान कांबळे,नंदू गायकवाड, किशोर बहादुरे,अशोक ढोकळे, अनिल कांबळे,आकाश गायकवाड, मंगेश मस्के,सनी तरकसे,बादल घाडगे, विशाल गायकवाड, भाऊराव ताल्डे,अजय पोटभरे, ओमकार कस्बे,आनंदराज साळवे,सुमित साळवे, अविनाश सुरवसे,अमोल सावंत, सुदर्शन कांबळे, अतुल मुंडे, तुळशीराम वैतागे, सनी चव्हाण, जितेंद्र जाधव,दिपक बहादुरे,मिलिंदराज साळवे,बाळा घाडगे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने