परळी तालुक्यातील लाडझरी येथील बिबदरा तलाव फुटला
परळी प्रतिनिधी. काल रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परळी तालुक्यातील लाडझरी येथील पाझर तलाव फुटला असून प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.
हा छोटा तलाव रात्री झालेल्या पावसाने फुटलेला असून त्याची पाहणी इरिगेशन डिपार्टमेंटचे उप अभियंता सावंत तसेच तलाठी भताने यांनी केलेली असून सदरील तलावाच्या पाण्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.
तलावाच्या पाण्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान झाले का याबाबत पाहणी करण्याचे आदेश व सूचना तलाठी व मंडळ अधिकारी यांना तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केलेल्या आहेत . सदरील तलावाचे पाणी बोरणा नदीला जाऊन मिळते. त्यामुळे बोरणा नदीकाठचे गावातील व शिवारातील नागरिक व शेतकरी यांना सतर्क राहण्याच्या इशारा तलाठी यांच्यामार्फत देण्यात आलेला आहे .या अनुषंगाने प्राथमिक माहिती नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांना कळविण्यात आल्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा