पत्ते खेळताना पकडलेला तो सरपंच कोण? परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई गुलदस्त्यात

पत्ते खेळताना पकडलेला तो सरपंच कोण? 
परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई गुलदस्त्यात 


परळी प्रतिनिधी.   परळी तालुक्यातील एका मोठ्या लोकसंख्येच्या गावात अवैध पत्ते खेळताना दोन दिवसांपूर्वी सरपंचासह अनेकांना पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहाथ पकडले होते.परंतू पुढे सरपंच सोडला की त्याचं काय झालं? परळी ग्रामीण पोलिसांची याप्रकरणी कारवाई मात्र जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवली जात असल्याचे बोलले जात आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी की, दोन ते तीन दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील धर्मापूरी मार्गावर असणा-या एका गावात परळी ग्रामीण पोलिसांनी अवैध पत्त्यांचा कल्बवर धाड टाकली.या धाडीमध्ये लाखो रुपयांसह अनेकांना ताब्यात घेण्यात आले.पकडलेल्या आरोपींमध्ये खुद्द त्या गावचा सरपंचही होता अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
   दरम्यान एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर पुढे परळी ग्रामीण पोलिसांनी या सरपंचाला सोडले की त्याच्यावर कारवाई झाली.किती जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले?   याप्रकरणी कोणता आर्थिक वव्यवहार झाला का असा सवाल जनतेतून होत आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने