नंदागौळ येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, केज येथील संस्था चालकाचा त्रास?





परळी प्रतिनिधी.       तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अनुकंपा तत्त्वावर सेवेत असणाऱ्या या तरुणाला पूर्वी कार्यरत असणाऱ्या केज येथील शैक्षणिक संस्था चालकाने त्रास दिला होता अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद गिते वय 25 याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.तो सध्या 
 आश्रम शाळा, वसंत नगर येथील प्राथमिक शाळेत अनुकंपा तत्त्वावर कामाठी ( सेवक) म्हणून  एक महिन्यापूर्वीच सेवेत रुजू झाला होता.यापूर्वी तो केज येथील एका निवासी शाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करीत परंतु त्या ठिकाणी बारा वर्षे झाले तरी त्याला संस्थाचालकांनी कायमस्वरूपी करून घेतले नव्हते . यामुळे तो आर्थिक आणि मानसिक संकटात असल्याचे बोलले जात होते. केज येथील याच संस्थेत त्याच्या वडिलांनीही शिक्षक म्हणून अनेक वर्ष सेवा दिल्याचे समजते.
    दरम्यान एक महिन्यापूर्वी तो परळी तालुक्यातील वसंत नगर येथील प्राथमिक आश्रम शाळेत  सेवक म्हणून लागला होता. काल त्याने नंदाघोळ येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली . या घटनेचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने