परळी वीज निर्मिती केंद्राचे संच क्रमांक 9 साठी महाराष्ट्र राज्य वीज महासंघाचे धरणे संपन्न


परळी प्रतिनिधी.      परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे नवीन थर्मल भागात संच क्रमांक 9 लवकरात लवकर सुरू करावे या व इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी महासंघाच्या वतीने परळी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
     वीज निर्मिती केंद्राच्या प्रशासकीय कार्यालयासमोर दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी महासंघाच्या वतीने सकाळी 11 वाजता या धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. नवीन थर्मल परिसरात संच क्रमांक नऊ साठी जमीन ताब्यात घेण्यात आलेली आहे या जमिनीवर लवकरात लवकर संच क्रमांक नऊ चे बांधकाम सुरू करण्यात यावे यामुळे परिसरातील हजारावर तरुणांना रोजगार मिळणार आहे याबरोबरच सध्या कार्यरत असलेल्या वीज निर्मिती संचात कर्मचाऱ्यांचे कपात न करता व कमी कर्मचाऱ्यावर काम करून न घेता कर्मचाऱ्यांना इतरत्र बदली न करता काम करण्यात येऊ द्यावी तसेच कमी असलेल्या कर्मचाऱ्यांची जागा भरण्यात याव्यात आधी मागण्यासाठी हे धरणे करण्यात आली. 
    या धरणे आंदोलनास परळी वीज निर्मिती कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्यासह शहरातील विविध नागरिक व संघटनांनी पाठिंबा दर्शविला. या आंदोलनात महाराष्ट्र राज्याचे वीज कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने