बीड प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन विकास मंत्री नामदार पंकजाताई मुंडे तसेच माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथ्रा या या गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे करावे तसेच गेल्या दोन ते तीन वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालयात बंदिस्त असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नवीन चबुतरावर बसविण्यात यावा या मागणीसाठी नाथ्रा गावातील बौद्ध समाजाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 20 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
नाथ्रा येथील नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा ग्रामपंचायत नमुना नं 8 अ ला नोंद करून पुतळ्या समोरील जिर्ण अवस्थेत असलेल्या सभागृहाच्या ठीकाणी सुसज्ज बौद्ध विहाराची निर्मिती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक तयार करावे या मागणीसाठी नात्रा येथील ग्रामस्थांचे गौतम आदमाने यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना लेखी निवेदन दिले होते. आद्याप पर्यन्त प्रशासनाकडून कसल्या प्रकरची दखल घेतली नसल्यामुळे गेली अनेक वर्ष नाथ्रा गावातील बौद्ध बांधवांच्या मागणी प्रमाणे प्रशासन दखल घेत नसून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याकरीता ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी परळी वै. यांच्या कडून महामानवाची अवहेलना होत आहे. म्हणून नाथ्रा बौद्ध बांधव आज दि. 20/08/2025 रोजी पासून मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड सामोर आमरण उपोषणा सुरुवात केली.
सदर आंदोलनात काही अनुचित प्रकार जिवित हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील.असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. नाथ्रा येथील समस्त बौद्ध बांधव त्यामध्ये महिला, पुरुष, बालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा