प्रतिकुल परिस्थितीवर मात करत गायत्री शिवगण बनली ‘सीए’

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत गायत्री शिवगण बनली ‘सीए’

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-  परळी येथील गोविंद मारोती शिवगण यांची कन्या कु.गायत्री शिवगण हिने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत सीए परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पदवी मिळवली आहे.
गायत्रीचे प्राथमिक शिक्षण परळीतील संस्कार प्राथमिक शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण मिलिंद विद्यालयातून घेतले. पुढे तिने लातूर येथील शाहू महाविद्यालयात 12 वी पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर तिने पदवीचे शिक्षण पुणे येथे घेतले.  पुणे येथे जॉब करत पदवीचे शिक्षण घेतले. पदवीचे शिक्षण घेत असताना ‘सीए’ च्या परीक्षा दिल्या. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून अथक परिश्रम घेत, शिक्षणाची दृढइच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीचे तिला मि
ळालेले हे फळ आहे. तिच्या यशामध्ये गुरूजनांचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांचे पाठबळ महत्वाचे आहे असे तिने या यशानंतर बोलुन दाखविले. 
   भविष्यात तिने आणखी मोठ्या उंचीवर पोहंचावे आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा अशा शुभेच्छा कुटुंबियांनी दिल्या. दरम्यान, बालासाहेब शिवगण, गोविंद शिवगण, योगीराज शिवगण, दत्ता शिवगण, किशोर शिवगण यांची ती पुतणी आहे. तिने कठीण परिस्थितीत मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र गायत्रीचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने