_उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त_ *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. परळी वैजनाथ यांच्या वतीने १५ ते २२ जुलै २०२५ सेवा संकल्प सप्ताह*

_उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त_

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. परळी वैजनाथ यांच्या वतीने १५ ते २२ जुलै २०२५ सेवा संकल्प सप्ताह*

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
          राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचा सेवा संकल्प सप्ताह 15 ते 22 जुलै 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके व शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली आहे.
          १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वा. योगासन स्पर्धा, सकाळी १०:०० वा सेवा संकल्प सप्ताह उदघाटन व धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सकाळी ११ वा. मृदंग स्पर्धा,,सायं ७:०० ते १०:०० वा .भावरत्न गुरुदास ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन १६ जुलै २०२५ रोजीयुवा पिढीसाठी सामाजिक भान जपणारे मनोरंजनात्मक व्यासपीठ- रिल्स स्पर्धा ,१७ जुलै २०२५: महिलांसाठी भजन स्पर्धा १८ जुलै २०२५:शालेय सांस्कृतिक महोत्सव (शहर)१९ जुलै २०२५:शालेय सांस्कृतिक महोत्सव (ग्रामीण) विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी.२० जुलै २०२५; आरोग्य शिबीर सर्वांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन२१ जुलै २०२५ सामान्य ज्ञान ,२२ जुलै २०२५ ना. अजितदादा पवार  यांचा अभिष्टचिंतन (सकाळी १०:३० वा.) परळी तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, शालेय साहित्य वाटप व बक्षिस वितरण सोहळा होणार आहे . तसेच प्रसिद्ध व्याख्याते महेश पाटील सर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आ
हे.
          तसेच या सेवा संकल्प सप्ताहात  ८ दिवस, दररोज विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्येआरोग्य तपासणी,मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीर, एपीएल फाॅर्मस्  डीबीटी योजना व शिधापत्रिका ऑनलाइन करुन देणे, घरकुल व विविध शासकीय योजना तक्रार निवारण,पर्यावरण संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम प्रत्येक नागरिकाला एक वृक्ष भेट!आधार कार्ड दाखवा व वृक्ष घेऊन जा उपक्रम,संजय गांधी निराधार योजना लाभार्थी यांचे आधार सिडीग, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी, डोमिसाईल आदी कागदपत्र एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी विविध प्रमाणपत्र कॅम्प,बांधकाम कामगार नोंदणी अभियान: नवीन नोंदणी व नूतनीकरणासाठी विशेष सोय,पक्षाशी जोडून घेण्यासाठी सुवर्णसंधी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी अभियान आदी कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे सर्व कार्यक्रम व उपक्रम होणार आहेत.
     या सेवा संकल्प सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच या सेवा उपक्रमांचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके व शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी व  सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने