ना. पंकजाताईंच्या संकल्पनेतील ग्रीन परळीसाठी पत्रकारही सरसावले स्टेशन रोडवर संपादक - पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण

ना. पंकजाताईंच्या संकल्पनेतील ग्रीन परळीसाठी पत्रकारही सरसावले 

स्टेशन रोडवर संपादक - पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण

परळी वैजनाथ 
        राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व माजी खाप्रीतमताई मुंडे यांच्या संकल्पनेतील "ग्रीन परळी, सुंदर परळी"चे स्वप्न साकार करण्यासाठी भा.ज.पा.च्या शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परळी शहरात सुरु असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत आज परळीतील संपादक- पत्रकार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. आज शहराच्या स्टेशन रोड परिसरामध्ये संपादक व पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, व्यापारी व नागरीकांची मोठी उपस्थिती होती.
            परळी शहर पूर्वीसारखे हरित व्हावे व आगामी काळात प्रदूषणाला आळा बसावा यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी शहरात देशी वाणाचे वृक्ष लागवड कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमात परळीकरांनी सहभागी व्हावे व आपल्या शहराचे वातावरण रम्य रहावे या
साठी भाजपा शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी विविध क्षेत्रातील परळीकरांना सहभागी करून घेत मोठी वृक्ष लागवड मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत शहराच्या विविध भागात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. "ग्रीन परळी" संकल्पना साकारण्यासाठी आज शहरातील संपादक आणि पत्रकार सरसावले आहेत. आज संपादक आणि पत्रकारांच्या हस्ते स्टेशन रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
     परळी कृषी उत्पन्न बाजार समितीपासुन वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, दीनदयाळ बॅंकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर देशमुख, मार्केट कमिटीचे सचिव बलवीर रामदासी, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर शालिनीताई कराड, पत्रकार सर्वश्री ज्ञानोबा सुरवसे, आत्मलिंग शेटे, मोहन व्हावळे, धनंजय आढाव, प्रवीण फुटके, महादेव शिंदे, धनंजय आरबुने, संजीब रॉय, सुकेशनी नाईकवाडे, धीरज जंगले, संभाजी मुंडे, बालासाहेब फड, विकास वाघमारे, श्रीराम लांडगे, बालाजी ढगे, सचिन स्वामी, भाजपाचे प्रशांत कराड, अश्विन मोगरकर, योगेश पांडकर, अ‍ॅड. अरुण पाठक, नितीन समशेट्टे, मोहन जोशी, वैजनाथ रेकने, श्रीपाद शिंदे, कुमार केदारी, सौ. माधुरी देशमुख, वर्षा जोशी, राजश्री कराड आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने