किस्से जाहिरातीचे
. ( भाग -1. )
जाहिरात हा वर्तमान पत्राचा एक अविभाज्य घटक आहे.कोणतेही वर्तमानपत्र चालवायचे म्हणजे संपादकांना जाहिरातींची आवश्यकता असतेच. वर्तमानपत्र चालवताना आर्थिक दृष्ट्या जाहिराती आवश्यक असतात. सर्वच वर्तमानपत्रांना सारख्या जाहिराती मिळतात असे नाही बऱ्याचदा राज्यस्तरावर प्रकाशित होणारे दैनिक विभागीय दैनिक जिल्हा दैनिक आणि साप्ताहिके अशी वर्गवारी करता येईल. वर्तमानपत्रांचा खप, त्यांचा दर्जा, यावरही जाहिराती अवलंबून असतात.
भांडवलदारी वृत्तपत्रे, आणि विभागीय स्तरावरून तसेच राजकीय पाठबळ असणाऱ्या वृत्तपत्रांना सहसा जाहिरातींचे अडचण येत नाही. शासकीय जाहिराती यादीवर असणाऱ्या वर्तमानपत्रांना भेटतात परंतु त्यांची बीले कधीच वेळेवर निघत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील वर्तमानपत्रे आणि त्यांच्या संपादकांना अनेक अडचणींना सामोरे जाऊन वर्तमानपत्रे चालवावे लागतात.
अशा परिस्थितीत ज्या जाहिराती मिळतात त्यावर वर्तमानपत्रांची आर्थिक स्थिती आणि नियमितता अवलंबून असते.मोठ्या शहरातून प्रकाशित होणारे दैनिके यांना त्या शहरात असणा-या उद्योग,मोठ मोठ्या कंपन्या यांच्या लाखो रुपयांच्या जाहिराती सहज मिळतात.त्यामुळे मुंबई, पुणे नागपूर औरंगाबाद आदि ठिकाणाहून प्रकाशित होणारे दैनिके साप्ताहिके मासिके यांना ते वृत्तपत्र चालविण्यासाठी खूप मोठी मदत होत असते.
बीड जिल्हा तसा राज्याच्या दृष्टीने विचार केला तर ग्रामीण भागातच मोडतो. बीड येथून म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणाहून प्रकाशित होणाऱ्या दैनिकांना सर्व तालुक्यातील प्रतिनिधी मार्फत जाहिरातींचा सोर्स उपलब्ध होतो त्यामुळे ती दैनिके तग धरून आहेत. परंतु फक्त तालुक्याच्या ठिकाणाहून एखादे वृत्तपत्र चालवणे महा कठीण काम आहे कारण ज्या काही जाहिराती मिळतात त्या मोजक्याच असतात त्यातल्या त्यात फक्त राजकीय जाहिरातीवर संपादक आणि पत्रकारांना अवलंबून राहावे लागते.
असा बीड जिल्ह्यातील विविध वर्तमानपत्रांना जाहिराती पुरवणारा महत्त्वाचा तालुका आहे राज्यातील सर्वच दैनिकांचे तालुका व शहर प्रतिनिधी परळी शहरात आहे आता अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी ही परळीत काम करत आहेत. सर्वांनाच जाहिरातीची गरज असते परंतु या जाहिराती मागचे किस्से सुध्दा गंमतीदार आहेत.अनेक राजकीय पक्षांच्या जाहिराती या बहुतेक त्यांच्या पीए मार्फत दिल्या जातात.
कोणताही नेता आपली राजकीय लोकप्रियता कायम राहवी,आपण करत असलेले कामे मतदारां पर्यंत पोहचावीत,आपण सतत लोकांच्या नजरेसमोर राहिले पाहिजे यासाठी वर्षाला लाखो, करोडो रुपये जाहिरांतीवर खर्च करत असतात.मग यामध्ये पक्षाचे विविध कार्यक्रम, पक्षाच्या नेत्यांचे वाढदिवस, विकास कामांचे उद्घाटने,पक्षांचे आंदोलन, मोर्चा,सभा,संमेलने, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आदी सार्वजनिक कार्यक्रम यांच्या जाहिराती दिल्या जातात.
परळीत क्वचितच वि
काही राजकीय पक्षांचे पीए आता इथे कुणाचे नाव घेणार नाही पण ते कोण आहेत.ते कशा जाहिराती देतात.जवळच्यांना लाखो रुपयांपासून ते पन्नास हजार, पंचवीस हजार,तर चेहरे बघून, हा आपल्या काही जवळ नाही, आपल्या पुढे पुढे करत नाही मग द्या याला केवढ्याचीभी.आपणाला कोण विचारणार आहे अशा तो-यात हे पीए जाहिराती वाटप करतात.
कधी कधी ज्याला दोन ओळीची बातमी नीट लिहिता येत नाही अशा पत्रकारांना तो फक्त आपल्या जवळचा आहे म्हणून मोठ्या जाहिराती मिळतात.जाहिराती देतांना सांभाळले जाते पण चांगले दैनिक असतांना, चांगल्या बातम्या लिहणा-या पत्रकारांना मात्र तुटपुंज्या जाहिराती देऊन बोळवण केली जाते. जाहिरात वाटपाची हा भेदभाव पत्रकारांतही असंतोष निर्माण करणारा असतो.पण जी मिळेल ती जाहिरात घेऊन त्यावर समाधान मानून काम करणारे पत्रकार झालेला अन्याय निमुटपणे गिळून पुन्हा दुसऱ्या जाहिरातींच्या प्रतिक्षेत असतात.
1997 पासून माझी पत्रकारिता सुरू झाली आहे.या दरम्यान जाहिराती आणि जाहिराती देणारांना फार जवळून अनुभवले आहे.अनेक जाहिरात दारांनी सहकार्य केले त्यांचे मनस्वी आभार.अनेकांनी जाहिराती दिल्या पण तोंड बघून, अनेकांनी जाहिराती दिल्या हात आखडून, अनेकांनी पैसे देतांना सतावले, अनेकांनी जाहिराती दिल्या पण बीलासाठी मागे लागून मागे लागून शेवटी अनेक जाहिरातींचे पैसे सोडून द्यावे लागले.
जाहिराती घेतांना व जाहिरातींचे बील मागतांना अनेक अनुभव आले.अनेक गंमती जमंती बघायला मिळाल्या.अनेक मजेशीर किस्से आहेत.जसे एखाद्याला जाहिरात मागितली तर पटकन छापा म्हणतात.पहिल्या पानावर येऊद्या पण पैसे द्यायचे नाव नाही.जे सारांश रुपाने, कुणाचेही नाव न घेता 'किस्से जाहिरातीचे' या सदरातून लिहिणार आहे. हे सदर सोशल मीडियावर सुध्दा प्रकाशित करण्यात येईल कुणाला लागलेच तर तो योगायोग समजावा.
रानबा गायकवाड
7020766674
टिप्पणी पोस्ट करा