उप अधीक्षक भुमी अभिलेख गिडमणीच्या कारभाराला परळीकरांसह कर्मचारी वैतागले

उप अधीक्षक भुमी अभिलेख गिडमणीच्या  कारभाराला परळीकरांसह कर्मचारी वैतागले 

परळी /प्रतिनिधी  

परळी भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक यांच्या कारभाराला तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी वैतागले असून अशा कामचुकार व गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी येथे तहसील कार्यालयाच्या  प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यावर भुमी अभिलेख कार्यालय आहे.हे कार्यालय तालुक्यातील शेतकरी तसेच प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.जमीनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार नोंदणी करणे, मो
जमाप करणे आदी महत्त्वपूर्ण कामे असतात.त्यामुळे सतत या कार्यालयात नागरिकांची गर्दी असते.परंतू उप अधीक्षक गिडमणी मात्र आठवड्यातून एक दिवसच परळीत येतात.बाकी घरूनच कारभार हाकत असतात.
     त्यांच्या या गैरहजारीला व मनमानीला कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक वैतागल्याचे बोलले जाते. अनेकांच्या नावनोंदणी फाईल जाणीवपूर्वक रिजेक्ट करून पुन्हा त्या सेटलमेंट करून, आर्थिक देवाणघेवाण करून कामे होत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.एवढेच नाही तर परळी गंगाखेड रस्त्याचे काम आवश्यक कागदपत्रे न दिल्याने तीन वर्षे काम रखडले होते.यासही भुमी अभिलेख उप अधीक्षक जबाबदार असल्याचे चर्चा होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने