रोहित सुभाष रोडे यांचे NEET 2025 मध्ये घवघवीत यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश

 रोहित सुभाष रोडे यांचे NEET 2025 मध्ये घवघवीत यश 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश 

परळी प्रतिनिधी.     परळी तालुक्यातील मौजे टोकवाडी येथील रहिवासी व वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुभाष रोडे यांचे चिरंजीव रोहित सुभाष रोडे याने NEET 2025 परीक्षेत 720 पैकी 544 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे कोणतेही शिकवणी अथवा क्लास न लावता त्याने हे यश मिळवल्यामुळे रोहित रोडचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
   रोहितने अत्यंत प्रतिकूल व हालाखीच्या परिस्थितीत कोणतेही क्लास न लावता, स्वतःच्या मेहनतीच्या आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. त्याच्या या प्रेरणादायी यशामुळे टोकवाडी गावासह संपूर्ण परळी ता
लुक्यातून त्याचे कौतुक होत आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांतून रोहितवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    अनेक पालक आपला पाल्य NEET परिक्षेत पास व्हावा म्हणून लाखो रुपये खर्च करून महागड्या कोचिंग  क्लासेसवर खर्च करीत असतात.अशा परिस्थितीत रोहितने मिळविलेले यश उल्लेखनीय आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने