उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या हस्ते जि. प. माध्यमिक शाळेत शाळा प्रवेश महोत्सवात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या हस्ते जि. प. माध्यमिक शाळेत शाळा प्रवेश महोत्सवात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप 

परळी प्रतिनिधी.     आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी शाळा प्रवेश महोत्सव साजरा करण्यात येत आहे. परळी उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या हस्ते परळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय पुस्तके वाटप करण्यात आली. 
    संपूर्ण महाराष्ट्रात आज दिनांक 16 जून पासून शाळा सुरू झाल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. या निमित्ताने विविध शाळांना  प्रशासकीय अधिकारी भेटी देत आहेत. परळीचे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी सकाळी शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची या शाळेस भेट देऊन शाळेची पाहणी केली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांची गुणवत्ता विषयक चाचणी घेतली. 
     यावेळी अरविंद लाटक
र यांच्या हस्ते पहिल्या दिवशी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जी.बी.शेख,सोलंकर सर, इंगळे सर,वाटेल सर, गायकवाड सर, पवार सर, नागरगोजे सर,शिंगाडे सर, शाकेर सर , चव्हाण सर , श्रीमती गर्जे अनिता मॅडम, श्रीमती ठोकरे आशा मॅडम आदी शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने