जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मिरवट येथे पहिलीच्या वर्गांतील मुलांची गाडीतून काढली मिरवणूक

जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मिरवट येथे  पहिलीच्या वर्गांतील मुलांची गाडीतून काढली मिरवणूक 


परळी प्रतिनिधी.    आज पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त शाळा प्रवेश महोत्सव साजरा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मिरवट येथे आज दिनांक 16 जून रोजी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांची शाळा व गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक काढून त्यांचे
स्वागत करण्यात आले.
      शाळेच्या पहिल्या दिवशी गावातील व्यसन मुक्ती चळवळीचे प्रणेते तुळशीराम पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके,बुट व सॉक्स वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार घुगे, सहशिक्षक  हाडबे सर, केंद्रे सर,  चौधरी सर,  कुचेकर सर,  पुरी सर, श्रीमती वंदना कराड मॅडम,श्रीमती जयश्री पुरी मॅडम व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने