संचमान्यतेच्या नावाखाली जिल्ह्यातील मराठी शाळा बंद पाडण्याचा प्रशासनाचा डाव - रानबा गायकवाड
परळी प्रतिनिधी. बीड जिल्ह्यात सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असलेल्या बीड जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांच्या संचमान्यता 0 दाखवून सदरील शाळा संचमान्यतेच्या नावाखाली बंद पाडण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे मत जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले आहे.तसेच जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी व मराठीप्रेमी नागरिकांनी प्रशासनाचा हा डाव हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात रानबा गायकवाड यांनी म्हटले आहे की,राज्य सरकारच्या मराठी शाळांच्या उदासीन धोरणामुळे आणि इंग्रजी प्रेमापोटी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत.तर राज्यातील अनेक शाळा उद्योजकांच्या घशात घातल्या आहेत.
त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीबांना शिक्षण घेणे अवघड होणार आहे.
त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीबांना शिक्षण घेणे अवघड होणार आहे.
बीड जिल्ह्यात पटसंख्याचे कारण पुढे करून सुमारे 20 पेक्षा अधिक हायस्कूल शाळांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 0 पटसंख्या दाखवून संच मान्यता दिलेली नाही.तर इयत्ता 9 वी आणि 10 वीसाठी एकही शिक्षक मान्यता नाही.यामुळे आता 16 तारखेपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतांना अतिरिक्त शिक्षकांचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.शिवाय ज्या भागात शाळा सुरू आहेत तेथील मुलांच्या शिक्षणावरही गंभीर परिणाम होणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन बीड जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने तात्काळ संच मान्यता द्यावी अन्यथा याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रानबा गायकवाड यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा