डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक धम्मक्रांती अधिक गतिमान व्हावी- अजयकुमार गंडले

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची  ऐतिहासिक धम्मक्रांती अधिक गतिमान व्हावी- अजयकुमार गंडले 

परळी ( प्रतिनिधी)  महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 14 ऑक्टोंबर 1956 साली जी ऐतिहासिक धम्मक्रांती केली. ती धम्मक्रांती अधिक गतिमान व्हावी असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत अजयकुमार गंडले यांनी केले. ते अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.
      विदर्भातील मैत्रेय बुद्ध विहार ,पृथ्वीराज नगर  ,धामणगाव ,जिल्हा अमरावती 
 येथे  प्रसिद्ध विचारवंत अजयकुमार गंडले यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी पुढे बोलताना अजयकुमार गंडले म्हणाले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
आपणाला विषमतेच्या खोलातून बाहेर काढले आहे. तसेच सर्व मानव जातीचा कल्याणकारी विचार असलेला विज्ञाननिष्ठ बुद्ध धम्म आपणाला नागपूर येथे ऐतिहासिक अशी धम्मक्रांती करून दिला. धम्मक्रांतीचा ही चळवळ अधिक गतिमान झाली पाहिजे. ती थांबता कामा नये.
    बौद्ध धम्माचे अनुकरण करणाऱ्या उपासक, उपासिका यांनी आपल्या जीवनामध्ये त्रिशरण, पंचशील, अष्टांग मार्ग यांचे आचरण केले पाहिजे. म्हणजे जीवनातून दुःखमुक्तीचा मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. सुरेश वानखडे सर यांनी या व्याख्यानाचे सुंदर असे आयोजन केले होते. यावेळी अजयकुमार गंडले  यांनी विस्तृत असा  बौद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुनिताताई दिघाडे यांनी केले.ध्यान साधना महेंद्र गजभिये सर तर 
 आभार  अशोक वाघमारे सर यांनी मानले. कार्यक्रमास संजय श्रीरामे, कुंदाताई बनसोड, वंदनाताई शेंडे, सुरेंद्र मनोहर, व्यंकट कांबळे, मधुकरराव जाधव सर यासह अनेक बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने