दिवाळी नवीन घरकुलात उपक्रम चांगला पण घर कुणाला देणार? खरे लाभार्थी घरापासून वंचित
परळी प्रतिनिधी. दिवाळी नवीन घरकुलात या उपक्रम अंतर्गत आज राज्य सरकारच्या वतीने परळी शहरात नटराज रंग मंदिरात भव्य असा कार्यक्रम पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. परंतु दिवाळी नवीन घरात पण घर कुणाला देणार असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्यांना राहायला घर नाही असे लाभार्थी घरकुलापासून अद्यापही वंचित आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
परळी शहरात तसेच ग्रा
मीण भागात ज्यांना पक्की घरे आहेत. दोन मजली, तीन मजली इमारती असणाऱ्या लोकांनी घरकुलाचा फायदा घेतलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मागासवर्गीयांसाठी विशेष घरकुल योजना राबविण्यात येते. परंतु या योजनेत धनदांडगे यांनीच जास्त लाभ घेतला आहे.
मीण भागात ज्यांना पक्की घरे आहेत. दोन मजली, तीन मजली इमारती असणाऱ्या लोकांनी घरकुलाचा फायदा घेतलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मागासवर्गीयांसाठी विशेष घरकुल योजना राबविण्यात येते. परंतु या योजनेत धनदांडगे यांनीच जास्त लाभ घेतला आहे.
ज्यांना राहायला व्यवस्थित घर नाही. कच्ची मातीची व वीटाची घरी आहेत. असा लाभार्थ्यांनी आपले अर्ज पंचायत समिती, नगरपालिकेत भरलेले आहेत परंतु अशांना घरकुल मंजूर झालेले नाहीत. अनेक जण पुढाऱ्यांकडे तसेच पंचायत समिती नगरपालिकेत चकरा मारून बेजार आहेत. परंतु त्यांना काही ना काही कारण सांगून घरकुल मंजूर झाले नाही असे सांगून परत पाठवले जाते. ग्रामीण भागातील एक जण तर गेल्या दहा वर्षापासून घरकुल मंजूर व्हावे म्हणून शासन दरबारी कागदपत्रे घेऊन चकरा मारत आहेत. परंतु त्याला अद्याप घरकुल मंजूर झालेले नाही.
दिवाळी नवीन घरकुलात ही संकल्पना चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात ज्यांना गरज आहे अशा सर्वसामान्यांना ते हक्काचे घर मिळाले तर खऱ्या अर्थाने त्यांची दिवाळी नवीन घरकुलात साजरी होईल अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल.
टिप्पणी पोस्ट करा