परळी तालुक्यात जातियवादी गावगुंडांची मातंग समाजाच्या सरपंचांच्या कुटूंबास जिवे मारण्याची धमकी
परळी -प्रतिनिधी
मातंग समाजाचे सरपंच असलेल्या पतीच्या पत्नीला रस्त्यात अडवून तुझा नवरा ग्रामपंचायतच्या कामामध्ये नाक का खुपसतो? म्हणत चक्क सरपंचांच्या कुटुंबांसच शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी जातीयवादी मानसिकता असलेल्या गावगुंडांनी दिल्याचा प्रकार बहुचर्चीत परळी तालुक्यातील दैठणाघाट गावात घडला आहे. काल दि.10 जून रोजी या प्रकरणी
याबाबत अधिक माहिती अशी कि, बापुराव आप्पा उधारे हे दैठणा घाट गावचे गेल्या अडीच वर्षांपासून विद्यमान सरपंच आहेत, मात्र ते मागास जातीतील मातंग समाजाचे असल्यामुळे त्यांना गावातील वरील गावगुंड हे ग्रामपंचायत मार्फत कुठलेही विकासकाम करू देत नाहीत. आणि स्वतःच्या मनमानी प्रमाणे ग्रामपंचायत चा कारभार हाकण्याचा प्रयत्न करतात, सरपंच नात्याने त्यांच्या कारभारास विरोध केल्यानंतर मांगट्यानो तुम्हाला कचऱ्यातून बाहेर काढून इथपर्यंत आणलय आणि तुम्हीच आमच्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज फाटे करता का? असे म्हणत ३ जुन २०२५ रोजी रात्री भरस्त्यात सरपंच पत्नी लताबाई बापुराव उधारे यांना वरील तिघांनी रस्त्यात अडवून शिवीगाळ आणि संपूर्ण कुटुंबांस जीवे मारण्याची धमकी दिली.
सरपंच पत्नी लताबाई बापूराव उधारे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामिण पोलिसांनी हनुमंत गुट्टे, शिवाजी गुट्टे व गोविंद गुट्टे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 352 351 (2) 351(3) 3(5) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक एक्ट 3(1)(r), 3(1)(s),3(2)(va) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेनंतर मातंग समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा