जेष्ठ पौर्णिमा निमित्त मृगदायवन महाविहारात भदंत पय्यातीस महाथेरो यांची धम्मदेसना संपन्न

जेष्ठ पौर्णिमा निमित्त मृगदायवन महाविहारात भदंत पय्यातीस महाथेरो यांची धम्मदेसना संपन्न 


परळी प्रतिनिधी.      
    मृगदायवन महाविहार, धम्म प्रशिक्षण संस्था सारनाथ पार्क, जवळा फकीर येथे जेष्ठ पोर्णिमेच्या निमित्ताने भदंत पय्यातीस महाथेरो यांची धम्मदेसना संपन्न झाली. या कार्यक्रमास अनेक मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    मृगदायवन महाविहा
रात भदंत पय्यातीस महाथेरो यांची धम्मदेशना झाली. यावेळी त्यांनी उपस्थित बौद्ध उपासक-उपासिका यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बौद्ध धम्मात पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपल्या आयुष्यात 
उपासक, उपासिका यांनी पंचशीलाचे आचरण करणे खूप महत्त्वाचे आहे. उपासकांनी आपल्या मुलांना धम्माचे धडे दिले पाहिजेत.
     या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच बौद्ध उपासक, उपासिका, बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने