आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा परिचय असलेला बीड जिल्हा आंबेडकरी योद्धा ग्रंथ वाचकांसमोर येणार

आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा परिचय असलेला बीड जिल्हा आंबेडकरी योद्धा  ग्रंथ वाचकांसमोर येणार 


    परळी प्रतिनिधी.     बीड जिल्ह्यातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्ते व समाजसुधारकांचा परिचय असलेला ऐतिहासिक असा 'बीड जिल्हा आंबेडकरी योध्दा'  हा ग्रंथ महाराष्ट्रातील वाचकांसमोर घेऊन येणार असल्याचे जेष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.  
   पत्रकात पुढे म्हटले आहे की,भारतात सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी, हजारो वर्षांची गुलामगिरी आणि अस्पृयशता नष्ट करण्यासाठी महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट केले.माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक लढे दिले.मनुवादी व्यवस्था उखडून फेकून देण्यासाठी क्रांतीचे रणशिंग फुंकले.हजारो वर्ष गुलामीत खिचपत पडलेल्या समाजाला जागृत केले.शिक्षीत केले, संघटित केले.प्रस्थापितांच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणले.
   भारतीय राज्यघटने
च्या माध्यमातून तर बाबासाहेबांनी त्यांना अपेक्षित समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था निर्माण केली.बाबासाहेबांचे हे क्रांतिकारी विचार घरा घरात पोहचविणारे, अन्याय अत्याचाराविरोधात लढा देणारे निष्ठावंत गायक,भीमशाहीर, नेते, कार्यकर्ते , समाजसेवक, सच्चे लढवय्ये भीमसैनिक,लेखक,विचारवंत, साहित्यिक,आंबेडकरी पक्ष, संघटना यांचा बीड जिल्ह्यात मोठा इतिहास आहे. या सर्व क्रांतिकारी आंबेडकरी योद्ध्यांचा महाराष्ट्राला परिचय व्हावा  या हेतूने  ' बीड जिल्हा आंबेडकरी योद्धा 'या  ऐतिहासिक ग्रंथाचे संपादन करण्यात येत आहे.
    बीड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धम्म चळवळीत कार्य करणारे नेते, कार्यकर्ते,व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी आपला फोटो व परिचयासह रानबा गायकवाड, संपादक ( आंबेडकरी योद्धा संपादकीय ग्रंथनिर्मिती) Mob -  7020766674 ,9420148538 ) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने