मराठा समाजाच्या नवीन आचारसंहितेनुसार झालं पहिलं लग्न ना हुंडा ना गर्दी ना वाजला डीजे

मराठा समाजाच्या नवीन आचारसंहितेनुसार झालं पहिलं लग्न 

ना हुंडा ना गर्दी ना वाजला डीजे 


जालना.       संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाने बैठक घेऊन  हुंडा प्रथा बंद करण्याची घेतलेली शपथ तसेच मुलीच्या आई-वडिलांना हुंड्यापायी आणि लग्नातील खर्चामुळे होणारा मानसिक, शारीरिक, आणि आर्थिक त्रास लक्षात घेऊन सर्वसाधारण कमी खर्चात लग्न करण्याची नवी आचारसंहिता जाहीर केली होती. त्यानुसार पहिले आदर्श लग्न मराठवाड्यातील जालना येथे लागले आहे. या लग्नातील वधू-वरांचे तसेच त्यांच्या पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    हुंडा नको मामा फक्त... ना DJ, ना अनावश्यक खर्च... मराठा समाजाच्या नव्या नियमांनुसार झालं पहिलं लग्न  First Marriage Held in Jalna as per New Maratha Guidelines मराठा समाजाच्या नव्या आचारसंहितेनुसार जालन्यातील परतुर येथे डॉ. नक्षत्रा बागल व डॉ. जगदीश शिंदे यांचा साधा विवाह 200 पाहुण्यांत पार पडला. सध्या या लग्नाची सर्वत्र चर्चा होत असून असे लग्न होणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने