परळीत आता सोमवार व गुरुवारी जनता दरबार - तहसीलदार
परळी प्रतिनिधी. तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आता बीड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात दर सोमवारी व गुरुवारी जनता दरबार आयोजित करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार परळी तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठविले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनता
दरबारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती तसेच आलेल्या सर्व नागरिकांच्या हरकती प्रश्न व तक्रारी ऐकून घेता येत नव्हत्या त्यामुळे अनेक नागरिकांना जनता दरबारातून परत जावे लागत होते.
दरबारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती तसेच आलेल्या सर्व नागरिकांच्या हरकती प्रश्न व तक्रारी ऐकून घेता येत नव्हत्या त्यामुळे अनेक नागरिकांना जनता दरबारातून परत जावे लागत होते.
ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना जनता दरबार आयोजित करण्यात सांगितले आहे. त्यानुसार आता परळी तहसील कार्यालयात आठवड्यातील सोमवार आणि गुरुवारी दुपारी बारा ते दोन या दरम्यान जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा