बीड जिल्हा शिक्षणाधिका-चा शिक्षक भरतीत 400 कोटींचा घोटाळा,? परळीत किती?
परळी प्रतिनिधी. बीड जिल्हा सध्या या ना त्या कारणाने महाराष्ट्रात गाजत आहे. आता जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील शिक्षक भरती आणि शिक्षकांच्या बदल्यात सुमारे चारशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे शासनाचे मत असून यावर बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी लागल्याचे समजते. या घोटाळ्यात परळी तालुक्यातील किती शाळांचा आणि शिक्षकांचा समावेश आहे याविषयी जनतेतून चर्चा होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे गेल्या काही दिवसापासून बोलले जात आहे. आता महारा
ष्ट्र शासनाने खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांच्या या घोटाळ्याची चौकशी लावली आहे. शिक्षणाक्षेत्र हे अतिशय पवित्र आणि महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. परंतु गेल्या काही दिवसापासून शिक्षण क्षेत्रातही प्रचंड भ्रष्टाचार व अनागोंदी वाढली आहे.
ष्ट्र शासनाने खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांच्या या घोटाळ्याची चौकशी लावली आहे. शिक्षणाक्षेत्र हे अतिशय पवित्र आणि महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. परंतु गेल्या काही दिवसापासून शिक्षण क्षेत्रातही प्रचंड भ्रष्टाचार व अनागोंदी वाढली आहे.
चिरीमिरी घेतल्याशिवाय शिक्षकांच्या बदल्या होत नाहीत असा शिक्षकांकडूनच हळुवार आवाजात आरोप केला जात होता परंतु उघडपणे कोणी बोलावयास तयार नव्हते. तर अनेक खाजगी शाळांमधून मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात शिक्षक भरती झालेली आहे या भरतीमध्ये संस्थाचालक, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या भूमिका महत्त्वाच्या असतात.
तसेच एखाद्या शिक्षकाची भरती केल्यानंतर त्याचा शालार्थ आयडी काढल्याशिवाय सदर शिक्षकाचा पेमेंट निघू शकत नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यात असे अनेक शिक्षकांचे शालार्थ आयडी काढून नियमबाह्य पद्धतीने पेमेंट काढून शासनाचीही फसवणूक झाल्याचे उघड होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने बीड जिल्हा शिक्षण विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
बीड जिल्हा प्रमाणे परळी तालुक्यातील असा शिक्षक भरती किंवा बदल्यातील भ्रष्टाचार लवकरच आम्ही जनतेसमोर आणणार आहोत. बीड जिल्ह्यात 400 कोटींचा तर परळीत किती असा सवाल जनतेतून निर्माण होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा