राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या परळी तालुका अध्यक्षपदी बाबा शिंदे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या परळी तालुका अध्यक्षपदी बाबा शिंदे यांची निवड 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी).  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या परळी तालुका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते बाबा शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
  बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या सुचनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बाबा शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या परळी तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. बाबा शिंदे यांचा परळी तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. बाबा शिंदे यांनी जनतेच्या विविध प्रश्नां
साठी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातुन आवाज उठवुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यांच्या कार्याची पक्षश्रेष्ठींकडुन दखल घेण्यात आली असुन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या परळी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
   दरम्यान बाबा शिंदे यांच्या या निवडीचे सर्वत्र मोठे स्वागत होत असून पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ती समर्थपणे परळी तालुक्यात राबवून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाबा शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने