अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सामुदायिक पाहिला फुले चित्रपट
परळीकरांनी चित्रपट पाहण्याचे केले आवाहन
परळी प्रतिनिधी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या कार्यकर्त्यांनी काल दिनांक 26 रोजी सामुदायिक थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट शहरातील नाथ चित्रपट गृहात पाहिला.तसेच परळीकरांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला फुले हा चित्रपट सध्या देश, विदेशातील चित्रपट गृहात झळकला आहे.सर्वत्र चित्रपटास प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा फु
ले यांची तर अभिनेत्री चित्रलेखा यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उत्कृष्ट भुमिका साकारली आहे.
ले यांची तर अभिनेत्री चित्रलेखा यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उत्कृष्ट भुमिका साकारली आहे.
हा चित्रपट परळी शहरातील नाथ चित्रपट गृहात लागला आहे.दररोज चार शो होत आहेत.काल अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या कार्यकर्त्यांनी, तसेच शहरातील फुले शाहू आंबेडकरी विचार धारेच्या नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी चित्रपटाचा आनंद लुटला. हा चित्रपट पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा