भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो हिमालयीन योगा वर्ल्ड पीस पुरस्काराने सन्मानित
बीड (प्रतिनिधी)
महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर (MIMC) लेह लडाख येथे दि.१५.०६.२०२५ रोजी -जागतिक योगा व मेडीटेशन उत्सव-२०२५ झालेल्या कार्यक्रमात पूर्णा येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष, भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांना "हिमालयीन योगा वर्ल्ड पिस" पुरस्कार बिहारचे राज्यपाल महामहिम आरिफ महम्मद खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबोधी इंटर नॅशनल मेडिटेशन सेंटर, लेह-लडाखचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू संघसेना हे होते. संस्थेच्या विद्यमाने सर्वप्रथम महामहीम राज्यपाल आरिफ महम्मद खान यांचा स्मृतिचिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक भन्ते संघसेना यांनी केल्यानंतर मा. राज्यपाल यांचे "योगा व विपस्सना" बद्दल समायोचित भाषण झाले या कार्यक्रमासाठी भारत-नेपाळचे राजदूत डॉ. शंकरप्रसाद शर्मा, लडाखचे खासदार हाजी हानिफा जन, डॉ. सदनामसिंग संधु (राज्यसभा सदस्य तथा चंडीगड वि
शालेय विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय एकात्मा या सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली.
महाराष्ट्र व देशात बौद्ध धम्म प्रसारक पु .भन्तेजी यांना पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल बीड जिल्ह्यातील पु भन्तेजी धम्मशील, प्रा प्रदिप रोडे , राजेंद्र घोडके , चंद्रकांत इंगळे.ॲड अनंतराव जगतकर,नागेश जौंधळ , प्रा गौतम गायकवाड , प्रा.बालाजी जगतकर यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा