छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचा गौरव - जनार्दन पाटील
सर्व सामान्यांसाठी दिल्लीत शिवस्वराज भवन उभारणार
परळी प्रतिनिधी. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे या महाराष्ट्राचे नाही तर देशाचा गौरव आहे.दिल्लीत महाराष्ट्राचा सन्मान वाढला पाहिजे. यासाठी मी प्रयत्नशील असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी शिवरायांचा आदर्श अंगीकारला पाहिजे असे प्रतिपादन विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रा चे प्रमुख जनार्दन पाटील यांनी केले.ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशभरात शिवरायांच्या नावाने ए
क लाखापेक्षा अधिक संस्था आहेत.परंतू त्यांच्यात देशपातळीवर समन्वय नाही.समन्वयाचा अभाव असल्याने महाराष्ट्राचे दिल्लीत जसे असायला हवे तसे स्थान नाही.तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, गुणवंतांचा, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा दिल्लीत गौरव करण्याचा संकल्प व्यक्त केला.तसेच देशपातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली कार्याचा प्रसार करण्यासाठी ही संघटना काम करत आहे.

महाराष्ट्राचा गौरव देशात वाढला पाहिजे.याकरिता अराजकीय उद्देशाने फुले शाहू आंबेडकरी, कल्याणकारी, मानवतावादी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिल्लीत विश्व भूषण राजे शिवछत्रपती चेतना संघटना काम करत आहे. सदर संघटना देशात 14 राज्यात कार्यरत आहे.लवकरच दिल्लीत छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते लवकरच दिल्लीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही जनार्दन पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे संजय सुरवसे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा