आम्ही शेती करतो म्हणून तुम्ही बसून खाता आत्मदहन करणा-या शेतकऱ्याचा आक्रोश 2019 पासून शेतकरी मागतोय शेताला वाट

आम्ही शेती करतो म्हणून तुम्ही बसून खाता 
आत्मदहन करणा-या शेतकऱ्याचा आक्रोश 

2019 पासून शेतकरी मागतोय शेताला वाट 

परळी प्रतिनिधी.      तो प्रशासनाच्या दिरंगाईला आणि काम न करण्याला वैतागून गेला.तो तहसील कार्यालयासमोर आला.अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करू लागला तोच पोलिस धावले आणि त्याला पकडले.परंतू शेतकरी मात्र शासन व प्रशासन यांच्या विरोधात आरडाओरडा करत होता.आम्ही शेती करतो म्हणून तुम्ही बसून खाता हे सांगत होता आणि तुम्ही शेतकऱ्यांला हाकलून देता असा आक्रोश करीत होता.
   यावेळी पोलीस व उपस्थित पत्रकारांना बोलताना सिरसाळा येथील शेतकरी ज्ञानेश्वर दहिफळे संतापून सांगत होता.मी 2019 पासून माझ्या शेतजमीनीला शेतरस्ता काढून द्यावा.पण तहसील प्रशासन माझं ऐकत नाहीत.तहसीलदा
र मला हाकलून देत आहेत.म्हणून नाईलाजाने मी आठ दिवसांपूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
  दरम्यान आज दिनांक 30 जून रोजी दुपारी बारा वाजता ज्ञानेश्वर दहिफळे यांनी तसेच कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेतले आणि काड्याचे डबे काढून आग लावून घेणार तोच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि दहिफळे यांना ताब्यात घेतली यामुळे यांचा जीव वाचला परंतु प्रश्न आहे ज्या मागणीसाठी दहिफळे यांनी स्वतःचा जीव पणाला लावला आहे तो प्रश्न आता तरी सुटणार आहे का.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने