भाजपा आ.बबनराव लोणीकरांच्या प्रतिमेला मारले जोडे
शेतकरी विरोधात केलेल्या वक्तव्याचा परळी काँग्रेसच्या वतीने केला जाहीर निषेध
परळी (प्रतिनिधी) भाजपा आ.बबनराव लोणीकरांनी शेतकरी विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ परळी काँग्रेसच्या वितीने लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत परळी तहसीलदार यांना शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. व या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
परळी तहसीलदार यांना काँग्रेस च्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात राज्यातील शेतकऱ्यांबद्दल अतिशय निंदनीय असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यातून त्यांची व त्यांच्या पक्षाची शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता लक्षात येते. तुझ्या बापाला पेरणीचे पैसे
मोदींनीच दिले, तुझ्या अंगावरचे कपडे, तुझ्या पायातील बुट व मोबाईल पण मोदींनीच दिला अशा प्रकारची मग्रुरीची भाषा त्यांनी वापरली. लोणीकर हे राज्यातील जनतेला लाचार समजत आहेत. त्यांची ही भाषा लोकशाहीत बरोबर नाही. उलट त्यांची आमदार की त्यांची गाडी, गाडीतील डिझेल त्यांचा इतर खर्च हा सर्वसामान्य जनतेचा पैशातुनच आहे. लोणीकरांचे वक्तव्य हे जनतेचा अपमान आहे या करिता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असून

दरम्यान बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्या बद्दल वापरलेल्या अप शब्दाचा निषेध म्हणून मोंढा मार्केट येथील विजयस्तंभा समोर बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले तर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश चिटणीस अँड.अनिल मुंडे, माजी शहराध्यक्ष प्रकाशराव देशमुख,शशी चौधरी , इतेशाम खतिब,वैजनाथ गडेकर,सुभाष देशमुख,रसुल खान,दिपक सिरसाट, बद्दरभाई,फरकुंद अली बेग,बाबासाहेब गिते,बाबा शेख अदी काँग्रेस पदाधिकारी सहभागी होते.
टिप्पणी पोस्ट करा