बुद्ध जयंतीनिमित्त परळीत भव्य धम्म रॅली व धम्मदेसनेचे आयोजन
सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – आयु. हनुमंत वाघमारे यांचे आवाहन
परळी (प्रतिनिधी):
तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त 12 मे 2025 रोजी परळी शहरात भव्य धम्म रॅली आणि धम्मदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून, परळी शहरासह तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांनी आणि धम्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे यांनी केले आहे.
सायंकाळी 6 वाजता
राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून भव्य धम्म रॅलीला प्रारंभ होणार असून ती मोंढा मार्केट मार्गे पुढे जाऊन परळी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त होणार आहे. रॅली दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचे संदेश देणारे फलक, धम्मचक्र ध्वज आणि अनुयायांची शिस्तबद्ध उपस्थिती या रॅलीला विशेष आकर्षण देणार आहे.

रॅलीच्या समारोपानंतर रेल्वे स्थानक येथील मोठ्या मैदानावर धम्मदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पूज्य भिक्खु रेवतबोधी यांचे धम्मदेशना होणार असून ते भगवान बुद्धांच्या करुणा, अहिंसा आणि समता या तत्वांवर आधारित मार्गदर्शन करतील. त्यांच्या धम्मदेशनातून समाजप्रबोधनास चालना मिळेल आणि युवकांमध्ये नैतिकतेचे भान जागृत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या निमित्ताने संपूर्ण परळी शहरात बुद्धमय वातावरण निर्माण होणार असून, बौद्ध बांधवांसाठी ही एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी संधी आहे. धम्म रॅली व धम्मदेशन कार्यक्रम शांततेच्या वातावरणात पार पडावा आणि समाजात एकोपा व बंधुभाव वाढावा, यासाठी आयोजकांकडून सर्व स्तरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे परळी तालुकाध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा