चालू बसमध्ये कंडक्टरला आला झटका
परळीकरांनी घडविले माणूसकीचे दर्शन
परळी प्रतिनिधी. रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या एस. टी. बसमध्ये अचानक कंडक्टरला सौम्य हृदयविकाराचा झटका आला आणि तात्काळ प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने गाडी थांबविल्याची घटना परळीत आज दिनांक 11 मे रोजी घडली . या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूला असणाऱ्या परळीकरांनी मदतीसाठी धाव घेऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज दिनांक 11 मे रोजी दुपारी पावणे बाराच्या सुमारास परभणी - लातूर MH20GC 3513 ही परभणी डेपोची एस. टी. बस परळी बस स्थानकातून लातूरच्या दिशेने निघाली. ही बस छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढे येताच बसचे कंडक्टर कुंभार यांना अचानक हृदयाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तात्काळ बस चालकांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन उभी केली. त्यानंतर कंडक्टर कुंभार यांना खाली उतरवून बाजूलाच असलेल्या झाडाच्या सावलीखाली झोपविण्यात आले. व त्यांना हवा घालण्या
त आली. तोपर्यंत आजूबाजूला असलेल्या परळीतील नागरिकांनी कुंभार यांच्याकडे धाव घेतली व त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न करू लागले.परंतू कुंभार यांच्याकडे असलेल्या गोळ्या त्यांनी खालल्या.
त आली. तोपर्यंत आजूबाजूला असलेल्या परळीतील नागरिकांनी कुंभार यांच्याकडे धाव घेतली व त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न करू लागले.परंतू कुंभार यांच्याकडे असलेल्या गोळ्या त्यांनी खालल्या.
. कुंभार यांना थोडे बरे वाटल्यानंतर परळीकरांनी ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना चहा, पाणी पाजून पुन्हा बस मध्ये बसवून सदर बस परळी डेपोकडे वाटे लावली.परळी डेपोतील वाहतुक निरिक्षक कपिल चिंदालीया व वाहतूक नियंत्रक राठोड यांनी त्यांना दवाखान्यात नेले.कुंभार यांनी उपचार घेतल्यानंतर ड्रायव्हर व कंडक्टर दोघांनाही आरामासाठी थांबवून घेतले आहे.निश्चितच परळीकर नेहमीच संकटकाळी मदतीला धावतात हे घटनेने दाखवून दिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा