बुद्ध जयंती निमित्त भव्य धम्म रॅली व श्रामनेर शिबिराचा समारोप
दैनंदिन जीवनात पंचशीलाचे आचरण महत्वाचे - भदंत पय्यातीस महाथेरो
परळी प्रतिनिधी. जगाला शांतीचा व समतेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या 2569 जयंतीनिमित्त जवळा फकीर येथे भव्य धम्म रॅली व दहा दिवसीय श्रावणी शिबिराचा समारोप करण्यात आला. दैनंदिन जीवनात पंचशीलाचे आचरण अतिशय महत्त्वाचे असल्याचे यावेळी भदंत पय्यातीस महाथेरो यांनी धम्मदेसना देतांना सांगितले .
मृगदायवन महाविहार धम्म प्रशिक्षण संस्था सारनाथ पार्क जवळा फकीर येथे दोन मे पासून दहा दिवसीय श्रामनेर शिबिर बदलत पाहिजे तेच महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या शिबिराचा समारोप 12 मे बुद्ध जयंती निमित्त करण्यात आला त्यापूर्वी भीमनगर येथून सकाळी भव्य अशी बुद्धमूर्तीची मिरवणूक काढण्यात आले या मिरवणुकीत शेकडो बौद्ध
उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धम्म रॅली मृगदायवन महाविहारात आल्यानंतर भदंत पय्यातीस महाथेरो यांची धम्मदेशना झाली. यावेळी त्यांनी उपस्थित बौद्ध उपासक-उपासिका यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बौद्ध धम्मात पंचशीलाचे आचरण खूप महत्त्वाचे आहे आपण दैनंदिन जीवनात कसे आचरण करतो यावरच आपण धम्माचे अनुयायी आहोत की नाही हे लक्षात येते.
बुद्ध जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या श्रामनेर शिबिरात 11 उपासकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व उपस्थितांना भोजनदान देण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा