हे आहे शिक्षणाचं महत्त्व, सामान्य बौद्ध कुटुंबातील तीन बहिणी लागल्या नोकरीला
दिक्षा,सोनाली,समिक्षाने फेडले आई वडीलांचे पांग
परळी(रानबा गायकवाड ). या देशातील तळागाळातील बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा मूलमंत्र देणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेणाऱ्या सामान्य बौद्ध कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी शासकीय नोकरीत लागल्याची घटना परळी शहरात घडली आहे. कष्ट करून आपणाला शिक्षण देणाऱ्या आणि जगविणाऱ्या आई-वडिलांचे दिक्षा , समिक्षा व सोनालीने पांग फेडले आहे.या तिघींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची,पदरी चार अपत्य असल्याने त्यांचा सांभाळ,शिक्षण कसे करायचे या सततच्या काळजीत परळी शहरातील शिवाजीनगर भागातील मनिषा विजय कदम या दुसऱ्याच्या घरची धुनी,भांडी,स्वयंपाक करत त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून घरखर्च भागवुन आपल्या तीन मुलींचे शिक्षण पुर्ण केले.गत आठवड्यात महापारेषणच्या भरतीमध्ये या तिन्ही मुली उत्तीर्ण झाल्या असुन महापारेषण विभागात विद्युत सहायक पदी दिक्षा, समिक्षा व सोनालीची निवड झाल्याने कदम कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
परळी शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी सौ.मनिषा विजय कदम वय ४० वर्षे यांना एकुन चार अपत्ये आहेत.पहिल्या ति
न्ही मुली झाल्याने वंशाला दिवा हवा म्हणुन पती विजय यांचा आग्रह असायचा तीन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला.यामुळे तिन्ही मुलींच्या शिक्षणासाठी पैसा नसायचा घरप्रपंच व मुलींच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा,मुली शिक्षणात हुशार असल्याने मनिषा यांनी यांनी घरकाम करण्याचा निर्णय घेतला.
न्ही मुली झाल्याने वंशाला दिवा हवा म्हणुन पती विजय यांचा आग्रह असायचा तीन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला.यामुळे तिन्ही मुलींच्या शिक्षणासाठी पैसा नसायचा घरप्रपंच व मुलींच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा,मुली शिक्षणात हुशार असल्याने मनिषा यांनी यांनी घरकाम करण्याचा निर्णय घेतला.
औष्णीक वीजनिर्मिती केंद्र वसाहतीत अधिकारी,कर्मचार्यांच्या घरी घरकाम करत त्यातुन मिळणार्या पैशातून मुलींचे शिक्षण व घरखर्च भागवु लागल्या १० बाय २५ फुटाच्या घरात हे सहा जणांचे कुटुंब नांदत असताना मोठी मुलगी दिक्षा हीने इयत्ता १० वी मध्ये चांगली टक्केवारी घेतल्याने तिला पुढे आयटीआय व इंजिनिअरिंगपर्यंत शिकवले २४ वर्षाची दिक्षा २०१९ पासुन मुंबई मेट्रोत काम करते.उर्वरीत सोनाली व समिक्षा या दोन्ही मुलींचे प्राथमिक शिक्षण परळी येथे झाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी लातुर जिल्ह्यातील बावची येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा येथे टाकले.या मुलींनी जिद्दीने अभ्यास करत दहावी व त्यानंतर आयटीआय मधील इलेक्ट्रशियन हा कोर्स केल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करू लागल्या दिक्षा, सोनाली व समिक्षा यांनी गत महिन्यात निघालेल्या जागांसाठी अर्ज भरले.याचा निकाल गेल्या आठवड्यात लागला असुन यात दिक्षा ही टेक्निशियन २ व विद्युत सहायक,सोनाली व समिक्षा या दोघीही विद्युत सहायक पदासाठी पात्र ठरल्या आहेत.अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत घरकाम करुन शिकवलेल्या तिन्ही मुलींच्या कष्टाला फळ आल्याने दिक्षा,सोनाली व समिक्षाची आई मनिषा यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून येत आहे.
दिक्षा ही बावची ता.रेणापूर येथील आश्रम शाळेत होती. सोनाली व समीक्षा या शिवाजीनगर येथीलच शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनीने मिळवलेल्या यशाचा शिवछत्रपती विद्यालयातील शिक्षकांनाही आनंद झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा