भक्त नको अनुयायी बना - पुज्य भिक्खु रेवतबोधी
परळी वै.: अंधभक्त नाही तर एक डोळस अनुयायी बना, तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचे अनुकरण करा असे प्रतिपादन पुज्य भिक्खु रेवतबोधी यांनी केले.ते परळी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दि. १२ मे २०२५ रोजी २५६९ वी बुद्ध जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भव्य धम्म रॅली , धम्म देसना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दि. १२ मे २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवानिमित्त परळी वै. शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते परळी वै. रेल्वे स्थानक परिसरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप
करण्यात आला. व त्यानंतर रेल्वे स्थानकासमोरील मैदानात पुज्य भिक्खु रेवतबोधी यांच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे परळी तालुकाध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे सर होते. यावेळी पुज्य भिक्खु रेवतबोधी यांचे स्वागत आयु. महादु सरवदे भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी मुख्याध्यापक यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे सर यांचे स्वागत आयु.बाबासाहेब पाचांगे सर , भा.बौ.महा.ता. हिशोबणीस यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षाचे सुचक आयु. जयपाल पाचांगे ,भा.बौ.महा.परळी वै. ता. संरक्षण सचिव, अनुमोदन आयु. योगेश मुंडे, भा.बौ.महा.परळी वै. ता. प्रचार पर्यटन उपाध्यक्ष यांनी केले . पुज्य भिक्खु रेवतबोधी यांना क्षमा याचना व त्रिसरण पंचशील याचना आयु. जे.के. कांबळे सर भा. बौ.महा. ता. संस्कार उपाध्यक्ष यांनी केली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. डॉ. स्वप्नील महाळंगीकर ,भा. बौ. महा. जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष तथा डिव्हीजन ऑफिसर समता सैनिक दल यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आयु. यशपाल बचाटे भा.बौ. महा. ता. सरचिटणीस परळी वै. यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयु.नी. प्रजावतीताई कांबळे , भा.बौ.महा. शहराध्यक्षा परळी वै. यांनी केले.

कार्यक्रमाला भा.बौ.महासभा जिल्हा शाखेच्या वतीने प्रा.डॉ.आर.डी.आचार्य सर जिल्हा संस्कार सचिव व आयु.नी.रुक्मिणीताई जोंधळे जिल्हा संघटिका हे आवर्जून उपस्थित होते. धम्मदेसनेच्या कार्यक्रमात पुज्य भिक्खु रेवतबोधी यांनी तथागत गौतम बुध्दांचे आणि धम्माचे भक्त नको अनुयायी बना असे मार्गदर्शन करत असताना बौध्द उपासक आणि बौध्द उपासिका यांना बुध्द धम्माच्या मार्गावर चालत असताना बुद्धांचे भक्त न होता बुध्दांचे अनुयायी बना असे सांगितले .तसेच परळी शहर भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने आयोजित बुद्ध जयंतीचे आणि कार्यक्रमाचे कौतूक पुज्य भिक्खु रेवतबोधी यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा शहर ,तालुका ,ग्रामीण व वार्ड शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.
या जयंती उत्सवानिमित्त परळी शहर आणि ग्रामीण भागातील बौध्द बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.त्यानंतर पहलगाम येथील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाच्या शेवटी सारणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा