बुद्धांच्या मानवतावादी शिकवणीला गतिमान करण्यात प्राचीन धम्म परिषदेचे अनन्य साधारण महत्व.– प्रा.डॉ.अनिल सिंगारे
माजलगाव ( प्रतिनिधी )
तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर बुद्धांच्या मानवतावादी विचारांची रुजवणूक करण्यासाठी प्राचीन कालीन धम्मपरिषदांचे महत्व अनन्यसाधारण असून यामुळेच खऱ्या अर्थाने भारतासह विविध देशात बुद्धांच्या विचारांचा प्रसार व प्रचार झाल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ अनिल सिंगारे यांनी श्रावस्ती बौद्ध विहारात बुद्ध पौर्णिमेनिमित्त बोलताना व्यक्त केले.
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित माजलगाव येथील श्रावस्ती बौद्ध विहारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव भालेराव होते.तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.अनिल सिंगारे होते.यावेळी उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले,सौ.इंगोले मॅडम ,शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ,सौ.अंजली सूर्यतळ, बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, बा. समितीचे उपसभापती श्रीहरी मोरे,नवनाथ धाईजे, रिपाइं तालुकाध्यक्ष अविनाश जावळे,वंचित बहुजन आघाडीचे सचिन उजगरे, माजी नगरसेवक सचिन डोंगरे,भीमराव टाकणखार, अशोक मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी बुद्ध पो. नि. राहुल सूर्यतळ व सौ.अंजली राहुल सूर्यतळ यांच्या हस्ते बोधिवृक्षाचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून झाले.
यावेळी प्राचीन कालीन बौद्ध धम्म परिषदांचे महत्त्व या विषयावर बोलताना प्रा.डॉ. अनिल सिंगारे म्हणाले की, प्राचीन कालखंडामध्ये सम्राट आजादशत्रू , राजा कालाशोक, सम्राट अशोक, राजा कनिष्क यांच्या काळात प्राचीन धम्मपरिषदा झाल्या. याधम्मपरिषदामध्ये बुद्धांच्या शिकवणीचे लेखन करून बुद्ध, धम्म व संघ या त्रीरत्नाला अनुसरून बुद्धाच्या मानवतावादी विचाराची रुजवणूक करण्यात आली. प्राचीन धम्मपरिषदात त्रिपिटके लिहिण्यात आले. त्यामुळेच आपणास आज बुद्धांच्या शिकवण्याच माहिती मिळते आहे.
यावेळी बोलताना बाबुराव पोटभरे म्हणाले की, तथागतचा भगवा म्हणजे त्यागाचा व समर्पणाचा विचार आहे. भगवाचे अनुकरण म्हणजे भगवान . बुध्दांनी माणसाच्या प्रगतीचा आणि माणूसपणाचा विचार केला. बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित धम्म आहे.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सदधम्म सेवा संघाचे सदस्य सोपान उजगरे, मळीबा चंदमारे, रविकांत उघडे,विकास डोंगरदिवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग जाधव यांनी केले.सूत्रसंचलन नवनाथ शिनगारे यांनी केले तर आभार गौतम घनघाव यांनी मानले.
................चौकट........
बुद्ध जयंती निमित्त बोलताना उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले म्हणाले की, विपश्यनेमुळे मानवाच्या विचाराची चेतना आणि संवेदना जागी होते. चेतना व संवेदना जागृत झालेला माणूस हा समाजासाठी एका विशिष्ट ध्येयाने काम करत असतो. आपण कोणतेही काम करा ते कुशल असावे.. कोणतेही क्षेत्र असू द्या. तुम्ही जे काम करताना ते उत्तम करावं हीच आपल्यासाठी विपश्यना असते..
टिप्पणी पोस्ट करा