परळी तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीला जातीयवादी ग्रामपंचायतीने केला विरोध
15 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण - मिलिंद घाडगे
परळी ( रानबा गायकवाड) या देशातील हजारो बहुजन समाजातील जातींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार देणाऱ्या महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बौद्ध वस्तीत उभारण्यात येणाऱ्या (प्रवेशद्वार) कमानीलाच परळी तालुक्यातील जातीयवादी मानसिकता असणाऱ्या दौनापूर ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. त्यामुळे याप्रकरणी सरपंच व इतरावर अटॅसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करावेत तसेच कमानीला परवानगी मिळावी या मागणीसाठी दौनापूर येथील बौद्ध समाज 15 मे पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यातील बौद्ध समाजात तीव्र संतापाचे लाट उसळली आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही व पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत तर वंचित बहुजन
आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचितचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी दिला आहे.
आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचितचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी दिला आहे.
याबाबत परळी तालुक्यातील दौनापूर येथील बौद्ध समाजाने बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी दौनापूर येथील बौद्ध समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीला बौद्ध वस्ती समोरील रस्त्यावर प्रवेशद्वार अर्थातच कमान उभारण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला. त्यावर ग्रामपंचायतीने परवानगी तर दिलीच नाही उलट सरपंच राजेभाऊ प्रभाकर आघाव यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेतला.व ठरावा द्वारे कमानीला परवानगी देण्यात येणार नाही असे सांगितले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वाराला विरोध करणाऱ्या व बौद्ध समाजाच्या भावना पायदळी तुडविणा-या सरपंच राजेभाऊ प्रभाकर आघाव तसेच विरोध करणारे बळीराम पांडुरंग आंधळे व विष्णू साहेबराव आघाव यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करावी तसेच कमान करण्याची परवानगी द्यावी अन्यथा १५ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाचा इशारा दौनापूर येथील बौद्ध समाजाने दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा