परळीच्या बस स्टॅन्ड ला सोनपेठचे पाणी?

परळीच्या बस स्टॅन्ड ला सोनपेठचे पाणी? 


परळी प्रतिनिधी.     परळी शहराला पाणीपुरवठा करणारे नागापूर येथील वाण धरण आणि चांदापूर येथील धरण हे मुबलक पाणीसाठा असणारे धरण उपलब्ध आहेत.असे असतानाही परळी बस स्थानक धुण्यासाठी सोनपेठ हून पाणीपुरवठा होतोय की काय असे दिसत आहे.
    परळी बस स्थानक हे जीर्ण झाले आहे. तसेच बस स्थानकाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या  निकामी झालेल्या आहे
त. प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून बस स्थानक परिसरात असणारी पाण्याची टाकी ही नेहमीच कोरडी ठक्क असते. त्यातच आज दिनांक 15 मे रोजी परळी बस स्थानक धुण्यासाठी एक टँकर बस स्थानक परिसरात उभे होते. त्यातून पाईप द्वारे बस स्थानक धुतले जात असल्याचे दिसून आले. 
   या टँकरवर सोनपेठ येथील राठोड मित्रमंडळातर्फे मोफत पाणीपुरवठा असे ठळक अक्षरात लिहिलेले होते. त्यामुळे सदर पाणी मोफत आणले असावे असेही नागरिकांत बोलले जात होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने