असा खर्च होतोय वैद्यनाथ तीर्थक्षेत्र योजनेतील पैसा परळीकरांनो बघा प्रदक्षिणा मार्गाच्या दुभाजकाचे काम , लोकार्पणा आधीच लागली वाट

असा खर्च होतोय वैद्यनाथ तीर्थक्षेत्र योजनेतील पैसा 
 
परळीकरांनो बघा प्रदक्षिणा मार्गाच्या दुभाजकाचे काम ,  लोकार्पणा आधीच लागली वाट 

परळी(प्रतिनिधी) 
 भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी आलेल्या 288 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास योजनेतील पैसा कसा खर्च होतोय हे प्रभू वैद्यनाथ प्रदक्षिणा मार्गाच्या निकृष्ट कामावरून दिसून येत आहे. लोकार्पण होण्या आधीच दुभाजक जागोजागी तुटल्याचे परळीकरांना दिसत आहे. निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना नेते संजय कुकडे यांनी केली आहे.
   परळी येथील प्रभु वैद्याथाच्या तिर्थक्षेत्र विकास योजनेतुन करण्यात आलेल्या प्रदक्षिणा मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब समोर आली असुन या रस्त्याचे लोकार्पन होण्या अगोदरच रस्ता दुभाजकास अनेक ठिकाणी तडे गेले असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.सदरील गुत्तेदारावर कारवाई करावी अशी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते संजय कुकडे यांनी केली आहे.

 बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभु वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकास योजने अंतर्गत सध्या अनेक कामे सुरु आहेत. मेरू पर्वत प्रदक्षिणा मार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे.या रस्त्याच्या कामात वापरलेले सिमेंट, दगड आणि अन्य साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी केल्यानंतरही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याच्या मधोमध उभारलेल्या दुभाजकाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.नंदागौळ रस्त्याच्या बाजुने दुभाजक पडले आहे.परळी तीर्थक्षेत्राला देशभरातून लाखो भाविक दरवर्षी परळीला येतात.लोकार्पणा अगोदरच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असुन वैद्यनाथ मंदिरासमोरुन जाणारी जड वाहनांची वाहतूक या मार्गाने वळविण्यात आली आहे.
 शासकीय  लोकार्पणाअगोदरच या रस्ता कामाचा दर्जा उघडा पडला असल्याने निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या त्या लाडक्या गुत्तेदारावर कारवाई करावी अशी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते संजय कुकडे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने