शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी आरोपींवर मकोका लावा या मागणीसाठी सोमवारी परळी बंद दहशत माजवणारांना हद्दपार करा - फुलचंद कराड

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी आरोपींवर मकोका लावा या मागणीसाठी सोमवारी परळी बंद 

दहशत माजवणारांना हद्दपार करा - फुलचंद कराड 

परळी (वार्ताहर)    परळी तालुक्यातील लिंबूटा गावचा तरुण शिवराज नारायण दिवटे याला झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ  व सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी परळीकरांच्या वतीने परळी बंदच आव्हान करण्यात आले असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन या घटनेचा निषेध करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर परळी शहरात दहशत आणि गुंडागर्दी माजवणाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हद्दपार करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांनी केली आहे.
    परळी शहर व तालुक्यात वारंवार मारहाणीच्या घटना घडत असून याला कुठेतरी चाप बसवणं गरजेचे आहे मागील काही महिन्यापासून परळी मध्ये गुंडागर्दी दादागिरी दहशत खूप वाढलेली आहे हे टोळ्या बनवून अनेक प्रकारच्या घटना घडव
त आहेत या टोळ्यांमध्ये 12 वर्षापासून 25 वर्षांपर्यंतचे  नवतरुण वर्ग व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहेत व या तरुणांच्या पाठीमागे परळी मध्ये अनेक कुटाणे करून वाम मार्गाने अमाप संपत्ती कमवलेले बलाढ्य श्रीमंत लोक असून त्यांचं अस्तित्व गुंडागर्दी दहशतवाद करून आबादी ठेवण्यासाठी तरुणांचा वापर करत आहेत 
    आज दिलेल्या निवेदनामध्ये पुढील प्रमाणे मागण्या केल्या आहेत नंबर 1) शिवराज नारायण दिवटे या तरुणाला मारहाण केलेल्या गुंडाची संघटित गुन्हेगारी मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी नंबर 2) परळी मध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळला असून मारहाणीच्या वारंवार घटना घडत आहेत या घटनांना आळा घालण्यात यावा नंबर 3) या प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी परळी शहर बंद करण्यात येत आहे नंबर 4) या प्रकरणांमध्ये आरोपीवर कठोर कारवाई नाही झाली तर व्यापक जण आंदोलन करण्यात येईल नंबर 5) महत्त्वाचे या प्रकरणांमध्ये जे आरोपी आहेत त्यांची परळी शहरातून धिंड काढण्यात यावी या मागणीचे निवेदन शनिवार 17 मे 2025 रोजी शहर व संभाजीनगर पोलीस स्टेशनला परळीकरांच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच यामध्ये सर्व व्यापारी सर्वपक्षीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने