2023 मध्ये शासन निर्णयाप्रमाणे वरिष्ठाच्या आदेशाने बदली झालेला कर्मचारी
अधिक्षक अभियंता चिश्ती यांच्या हितसंबंधाने अजूनही परळीतच - राजेश सरवदे
परळी प्रतिनिधी. मराठवाडा जनसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता,दक्षता पथक, परिमंडळीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या तक्रारीवरून परळी वैजनाथ येथील अधीक्षक अभियंता,बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ येथे शासकीय सेवेत 2008 पासून ते आज पर्यंत एकाच कार्यालयात कार्यरत असलेले एच.एस.गायकवाड,प्रथम लिपिक यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे असे लेखी आदेश देऊन देखील व संबंधित कर्मचारी यांच्या रिक्त होणाऱ्या पदी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण बीड येथे कार्यरत असलेले मुळे प्रथम लिपीक यांची परळी वैज
नाथ मुख्यालयी संबंधित एच.एस.गायकवाड प्रथम लिपिक यांच्या जागी पर्यायी बदली झालेली असताना देखील सदरील मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता इ.म.चिश्ती यांनी आपल्या मनमानी कारभाराने शासन निर्णय व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपीली दाखवली आहे. त्यामुळे चिश्ती अधीक्षक अभियंता यांचीच चौकशी करून शासन निर्णयाचे व वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी मा. उपसचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई, यांच्याकडे राजेश सरवदे यांनी केली आहे.
नाथ मुख्यालयी संबंधित एच.एस.गायकवाड प्रथम लिपिक यांच्या जागी पर्यायी बदली झालेली असताना देखील सदरील मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता इ.म.चिश्ती यांनी आपल्या मनमानी कारभाराने शासन निर्णय व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपीली दाखवली आहे. त्यामुळे चिश्ती अधीक्षक अभियंता यांचीच चौकशी करून शासन निर्णयाचे व वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी मा. उपसचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई, यांच्याकडे राजेश सरवदे यांनी केली आहे.
परळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष राजेश सरवदे यांनी दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी अधीक्षक अभियंता दक्षता पथक परिमंडळ कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे असणारे बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ या कार्यालयातील कार्यरत असलेले एच.एस.गायकवाड, प्रथम लिपीक हे मागील पंधरा(15) वर्षांपासून एकाच कार्यालय ठाण मांडून आहेत.तरी त्यांची बदली न झाल्याने बदली करण्यात यावी अशी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनंतर दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर यांनी बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ या कार्यालयाचे अधीक्षक अभियंता चिश्ती यांना पत्र पाठवून एच.एस.गायकवाड,प्रथम लिपीक यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले परंतु वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे पालन करण्याऐवजी चिश्ती अधीक्षक अभियंता यांनी एच.एस.गायकवाड,प्रथम लिपिक यांना वाचण्यासाठी तक्रारदार राजेश सरवदे यांनाच 2 मे रोजी लेखी पत्र दिले व गायकवाड यांच्या जागी जोपर्यंत बदली झालेला दुसरा कर्मचारी येत नाही तोपर्यंत त्यांना कार्यमुक्त करता येणार नाही.असे सांगितले दरम्यान दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर यांनी स्पष्ट शब्दात यापूर्वी दोन्ही मंडळ कार्यालयास कळविण्यात आलेले आहे.श्री गायकवाड यांच्या जागी पर्यायी म्हणून मुळे यांना व मुळे यांच्या जागी श्री गायकवाड यांना बदलीने कार्यमुक्त करण्यात यावे असे कळविण्यात आलेले असताना आपले हितसंबंध जपण्यासाठी चिश्ती अधीक्षक अभियंता हे गायकवाड यांना वाचवित आहेत तर वरिष्ठांचा आदेश डावलत आहेत .
नियमाप्रमाणे एखाद्या कार्यालयातील कर्मचारी बदली होऊन गेला तर त्याचा कार्यभार नवीन कर्मचारी येईपर्यंत दुसऱ्याकडे देता येतो पण अधीक्षक अभियंता हे तसे न करता नियमांनाच धाब्यावर बसवत असल्याने चिश्ती अधीक्षक अभियंता यांच्यावर मा.मुख्यमंत्री व मा.जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी कारवाई करावी अशी मागणी राजेश सरवदे यांनी दक्षता पथक छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा