बायको मिळावी म्हणून महाराष्ट्रात पोरं काढताहेत मोर्चे, परभणीच्या पठ्यान जपानच्या मुलीशी केले लग्न
परभणी (मानवत ) आपले लग्न जुळावे, मनासारखी बायको मिळावी म्हणून महाराष्ट्रात पोरं कलेक्टर कार्यालयांवर मोर्चे काढत आहेत. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील मानवत येथील पठ्याने चक्क जपान मधल्या मुलीशी आपले सूत जुळविले आणि भारतात तिच्यासह त्यांच्या कुटुंबियांना बोलवून थाटामाटात लग्नही केले. सध्या मराठवाड्यात या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
९० च्या दशकातील बहुतेक जणांनी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघाले लंडनला’ हे एकपात्री प्रयोगाचे नाटक ऐकले व पाहिले होते. परंतू, आता मात्र परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील गोविंद रामपुरीकर यांनी वऱ्हाड निघाले लंडनला याला फाटा देत वऱ्हाड आलंय टोकिओहून परभणीला याची प्रचिती जिल्ह्याला दिली. तालुक्यातील रामपुरी गावातील गोविंद रामपुरीकर या युवकाचे थेट जापानच्या जेनिफर या युवतीशी सुत जुळले. त्यानंतर दोघात प्रेम झाले. जेनिफरला भारतीय संस्कृती विषयी आकर्षण होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि जपानच्या टोकियोमधून थेट परभणीच्या रामपुरी हे गाव गाठले. सोबत जेनिफरचे आई-वडील देखील मुलीचे कन्यादान करण्यासाठी आले. आणि मोठ्या थाटामाटात परभणीच्या रामपुरी गावात हा लग्न सोहळा पार पडला.
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामपुरी गावचा गोविंद पहिली ते आठवीपर्यंत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकला. नववी व दहावीचे शिक्षण लातूर जिल्ह्यात मावलगाव (ता.अहमदपूर) येथे घेतले. त्यानंतर अकरावी व बारावी सायन्स त्याने परभणीतील भारत-भारती कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. पुढे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१६ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स या विषयात पदवी संपादित केली. त्यानंतर पुणे येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमध्ये २ वर्षे जॉब केला.त्यानंतर दरम्यान टाटा कंपनीने त्याला एका प्रोजेक्टसाठी जपान देशात पाठवले. जपानमधील टोकियो शहरात कंपनीत काम करत असताना त्याच भागात कॉर्पोरेशन लोकल बॉडीमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर असलेल्या राधिकासोबत कामानिमित्ताने ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. राधिकाला भारतीय संस्कृतीबद्दल विशेष आकर्षण असल्याने अधून-मधून त्या विषयावर चर्चा व्हायची. दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि आपापल्या कुटुंबियांना निर्णय कळवला. राधिकाचे वडील नोकरीतून रिटायर झालेले असून आई अजूनही जॉब करतात.वडिलांनी मुलीच्या निर्णयास होकार दिला. मात्र, आईला जावई बाहेर देशातला असल्याने सुरुवातीला मुलीची काळजी वाटली आणि तिची संमती मिळायला जवळपास एक वर्ष लागलं. अखेर दोन्ही बाजूनं होकार मिळताच जपानमध्येच लग्न करायचं आणि कुटुंबीयांसह जवळच्या नातेवाईकांना तिकडं बोलवायचं, असा विचार गोविंदनं मांडला. मात्र त्याच्या वडिलांच्या इच्छेनुसार रामपुरी येथेच स्वखर्चानं व भारतीय पद्धतीनं लग्न करण्याचं ठरलं.
शनिवारी (दि.१०) दुपारी १२.३० वाजता रामपुरी येथील श्री दत्त मंदिरात गोविंद व राधिका यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. यावेळी जवळपास २ हजार लोक उपस्थित होते.दरम्यान स्त्रीभ्रूणहत्येमुळे महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर कमी झाल्याने वयात आलेल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळेना झाल्या आहेत.मागे एकदा सोलापूर जिल्ह्यात तर वयात आलेल्या पोरांनी वधू मिळाव्यात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
टिप्पणी पोस्ट करा