5 फुटांच्या वादात परळी - गंगाखेड हायवे रस्त्याच्या पुलाचे काम ३ वर्षांपासून रखडले
मात्र नागरिकांना सोसावा लागतोय त्रास
परळी प्रतिनिधी
परळी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून रखडले असून फक्त ५ फुटांच्या रस्त्याच्या वादांमुळे हे काम रखडले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवकरच तोडगा काढून रखडलेले पुलाचे व रस्त्याचे काम त्वरित सुरू केल्यास पावसाळ्यापूर्वी नागरिकांना होणारा त्रास वाचू शकेल.
परळी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू असून संपूर्ण रस्ता पुर्ण झाला आहे मात्र या रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यावरील फक्त पाच फुटांच्या जागेसाठी हे काम रखडले
आहे. या रस्त्याच्या जागेचा जमीनमालक प्रदिप तातेड व रेखा फड या दोघांमध्ये जागेचा वाद सूरु असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वादामुळे पुलाचे काम रखडले आहे. काम रखडल्याने या रस्त्यावरील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून राजकीय प्रस्थामुळे या वादाकडे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महामार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी यांच्यातील वाद मिटवून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनोज संकाये यांनी अनेकवेळा महामार्गाच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिले असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तरी हा वाद मिटवून रखडलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

------------------------
अमित उबाळे सहाय्यक अभियंता यांनी सांगितले की, गेल्या वर्ष भरापासून जमीनमालक दोघांतील पाच फुट जागेचा वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत नाही तरी आम्ही प्रयत्न करत आहोत.
------------------------
अॅड रेखा फड यांनी सांगितले की, आमच्या प्लाॅटींग मध्ये या रस्त्यावरील पाणी येत आहे ते पाणी समोरील रतन सिटीच्या प्लाॅटींग मधून हे पाणी काढावे. नाला सुरळीत करावा व तातडीने हे काम पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा