300 कोटी रुपये दिलेत, असले काम करतोस का म्हणत अजितदादांनी गुत्तेदाराला झाप झाप झापले

300 कोटी रुपये दिलेत, असले काम करतोस का म्हणत अजितदादांनी गुत्तेदाराला झाप झाप झापले 


परळी प्रतिनिधी.   आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी परळी शहरात चालू असलेल्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास कामांना भेट दिली. कामाच्या दर्जावर असमाधान व्यक्त केल्यानंतर 300, कोटी रुपये दिलेत असले काम करतोस का?  असे म्हणत ना.अजितदादा पवार यांनी संबंधित गुत्तेदाराला झाप झाप  झापले . व चांगले कामे करा अशी तंबी दिली.
    आज दिनांक 19 मे रोजी सकाळी ना.अजितदादा पवार बीड जिल्हा दौऱ्याची सुरुवात परळी शहरातील तीर्थक्षेत्र विकास कामांच्या
पाहणीने केली.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर विविध कामांचा शुभारंभ व पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी वैद्यनाथाचे दर्शन घेऊन वैजनाथ तीर्थ विकासाचे कामाची  अजितदादा पवार,आ .धनंजय मुंडे यांनी पाहणी केली असताना याच वेळेस अजित दादांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर त्यांना अशी कामे करतात का?, तुला  तीनशे कोटीचे कामे दिली आहेत. तू ये आमच्याकडे तुला मी दाखवतो आम्ही कसे काम करतो असे बोलत दादांनी गुत्तेदाराचे चांगलेच कान टोचले. यावरून गुत्तेदाराचे पितळ उघडे पडले.
    मंदिराच्या पायऱ्याचे दगड आहेत. दगडात तू आता आत मध्ये सिमेंट भरणार. दगडाची मजा राहील का? .  नीट काम करा असंही दादांनी ठेकेदारस सुनावले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने