परळी बंदने झाले पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे स्वागत
बंद चिरडण्यासाठी पोलिसांनी केला बळाचा वापर
परळी (वार्ताहर) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार हे आज शहरात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत होणाऱ्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. दादांचे स्वागत परळी बंदने होणार हे स्पष्ट झाले आहे. एका टोळक्याकडून शिवराज दिवटे या तरुणास झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी आज सर्वपक्षीय परळी बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या संघटित गुन्हेगारीवर आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर अजितदादा काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.दरम्यान रीतसर निवेदन दिल्यानंतरही परळी पोलिसांनी बंद चिरडण्यासाठी बळाचा वापर केला. व बंदचे आवहान करणाऱ्या संयोजकांनाच अजितदादा येणार असल्याने नजर कैदेत ठेवत पोलिसांनी लोकशाहीचा गळा दाबण्या
चे काम केले आहे.
चे काम केले आहे.
परळी तालुक्यातील लिंबूटा गावचा तरुण शिवराज नारायण दिवटे याला झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ व सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी परळीकरांच्या वतीने परळी बंदच आव्हान करण्यात आले असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन या घटनेचा निषेध करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार दिनांक 19 रोजी शहरात येत आहेत .ते परळीत आल्यानंतर वैद्यनाथ मंदिरात प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन नंतर तीर्थक्षेत्र विकास कामांची पाहणी केल्यानंतर चेमरी रेस्ट हाऊस येथे बैठक घेणार आहेत
या बैठकीस माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
सध्या महाराष्ट्रात शिवराज दिवटे मारहाण प्रकरण गाजत असल्यामुळे आणि परळी बंद असल्यामुळे नामदार अजितदादा पवार यांचे स्वागत जोरदारपणे करण्याची संधी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाली नाही. तसेच एकूणच बीड जिल्ह्यात वाढत असलेले गुंडागर्दी आणि संघटित डोळ्यांचा उच्छाद यावर अजित दादा पवार काय भूमिका मांडतात आणि पोलिसांना काय आदेश देतात याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान शिवराज दिवटेस अमानुष मारहाण झाल्यानंतर दिनांक 17 मे रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्व पक्षीय परळी बंदचे आवाहन केले होते.तरीही आज सकाळी बंद सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी देवराव लुगडे महाराज व केशव साबळे या संयोजकांना ताब्यात घेऊन संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या आवारात नजर कैदेत ठेवले.
टिप्पणी पोस्ट करा