परळी तहसील येथे महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त, मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम _मा.आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय ध्वजारोहण सोहळा_

परळी तहसील येथे महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त, मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम

_मा.आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार शासकीय ध्वजारोहण सोहळा_


परळी (प्रतिनिधी):


महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या ६६व्या स्थापना दिनानिमित्त, दि. १ मे २०२५ रोजी सकाळी ८.०० वा., परळी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात *मा.आ.श्री. धनंजय पंडीतराव मुंडे (विधानसभा सदस्य, परळी) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे.* कार्यक्रमाचे आयोजन अरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, व  व्यंकटेश मुंडे तहसीलदार परळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.


या शासकीय समारंभात विविध विभागांचे अधिकारी, पोलीस प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी, सेवाभावी संस्था, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 ध्वजारोहण कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली वाटचालीला सलामी द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने