1 मे रोजी काँग्रेसच्या वतीने परळीत सदभावना संकल्प सत्याग्रह - राहूल सोनवणे
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राहणार उपस्थित
परळी प्रतिनिधी. महाराष्ट्र धर्म वाढवावा व बीड जिल्ह्यात सामाजिक सलोखा कायम रहावा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनी परळी शहरात सद्भावना संकल्प सत्याग्रह आयोजित करण्यात आल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की, दिनांक 1 मे 2025 रोजी मोंढा मार्केट येथील हुतात्मा स्मारक वर ध्वजारोहण केल्यानंतर
सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान सत्याग्रह करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा पूर्व पदावर यावे व सर्व जाती धर्मात सलोखा कायम राहावा यासाठी या सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सत्याग्रहात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनीताई पाटील यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

या पत्रकार परिषदेला परळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई, काँग्रेस पक्षाचे प्रसिध्दी विभाग प्रमुख बिक्कड यांच्यासह तालुका व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा