बाबासाहेबांची जयंती ही केवळ उत्सव नाही, ती विधायक संकल्पांची चळवळ असावी - प्रा. डॉ. माधव रोडे
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे बहुजन विकासाच्या प्रवाहात - मिलिंद घाडगे
परळी/ प्रतिनिधी-
महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही केवळ उत्सव नाही तर ती विधायक संकल्प करण्याची चळवळ असावी असे प्रतिपादन प्रा. डॉक्टर माधव रोडे यांनी केले ते सोनपेठ तालुक्यातील शिरसी बुद्रुक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे बहुजन समाज आज विकासाच्या प्रवाहात आला असल्याचे वंचितचे नेते मिलिंद घाडगे यांनी सांगितले.
"स्वाभिमान, समता
आणि बंधुतेचा जाज्वल्य दीप बाबासाहेबांनी पेटवला आहे; आता तो दीप पेटता ठेवणे ही आपल्या तरुणांची जबाबदारी आहे!"
आणि बंधुतेचा जाज्वल्य दीप बाबासाहेबांनी पेटवला आहे; आता तो दीप पेटता ठेवणे ही आपल्या तरुणांची जबाबदारी आहे!"
सिर्शी बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. रोडे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर सिरसाठ होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद घाडगे, सोळंके साहेब, अंकुश पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . पुढे बोलताना प्रा.माधव रोडे म्हणाले की,स्वाभिमान, समता आणि बंधुतेचा जाज्वल्य दीप बाबासाहेबांनी पेटवला आहे; आता तो दीप पेटता ठेवणे ही आपल्या तरुणांची जबाबदारी आहे!" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केल्यास आपल्यातील असीम क्षमतेची जाणीव होते. बाबासाहेबांनी वंचित, शोषित घटकांच्या वेदनांवर समतेची फुंकर घालत मानवतेचा नवा इतिहास घडवला. त्यांनी दिलेले स्वाभिमान, बुद्धिमत्ता आणि मानवतावादाचे बळ तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजे. जयंती म्हणजे केवळ साजरी करायची घटना नाही, तर नवे संकल्प, नव्या वाटचालीचा आरंभ असावा. त्यांच्या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊन युवकांनी विधायक संकल्प करावेत," असे प्रतिपादन महामानव हितकारणी सभेचे प्रा. माधव रोडे यांनी केले.
कार्यक्रमात सोनपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एन. बोलमवाड यांचीही उपस्थिती होती.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे व प्रभाकर सिरसाठ यांनीही आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजभाऊ रणरिवे, अजय रणदीवे, दीपक व्हावळे, रंजीत रणदीवे, संदीपान रणदीवे, आनंद रणदीवे व अनिल डबडे आदिंनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा