परळी - गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडले
विद्यार्थी , शेतकरी व वाहनधारकांना सोसावा लागतोय गुत्तेदारामुळे त्रास
परळी प्रतिनिधी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याने जवळच असलेल्या पोद्दार लर्न स्कूलचे विद्यार्थी, शेतकरी व वाहनधारकांना गुत्तेदारामुळे त्रास सोसावा लागत आहे. तर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचे चर्चा होत आहे. रखडलेल्या पुलाच्या कामामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.या रखडलेल्या पुलामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी आजुबाजूच्या शेतात पाणी जमा होत असल्याने या पुलाचे काम तात्काळ होणे गरजेचे आहे. मागील पावसाळ्यात हा महामार्ग याच पुलामुळे कित्येक वेळा वाहतुकीसाठी प्रशासनाला बंद करावा लागला होता.
या बाबत दाऊतपुर,दादाहारी वडगाव, दगडवाडी,धर्मापुरी रोड ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देखील दिले आ
हेत.तीन वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाबाबतचे निवेदन लोकप्रतिनिधींनी देऊन देखील पुलाचे काम होत नसल्याने नागरिक आता हवालदिल झाले आहेत. राष्टीय महामार्ग प्राधिकरण लातूर कार्यालया अंतर्गत येणाऱ्या रखडलेल्या पुलाच्या कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून या पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान पावसाळा अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. आता तरी हा पूल पूर्ण होईल का अशी चर्चा नागरिकातून होत आहे. याच पुलावरून पोद्दार धर्म स्कूलचे हजारो विद्यार्थी ,शेतकरी ,दोन्ही नवीन थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना व सिमेंट फॅक्टरीच्या हजारो कर्मचाऱ्यांना रोज ये जा करावी लागते. त्यामुळे या पूलाचे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा