डीजेच्या कर्कश आवाजाचा समाजातील महिला,मुले व वृध्दांना त्रास --मिलिंद घाडगे

डीजेच्या कर्कश आवाजाचा समाजातील महिला,मुले व वृध्दांना त्रास --मिलिंद घाडगे


परळी प्रतिनिधी.    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत जे मोठ मोठे डीजे लावले जात आहेत.या डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा महिला, लहान मुले वयोवृद्धांना त्रास होत असल्याचे दिसत आहे त्यामुळे इतर वाद्यांचा जयंती मंडळांनी अवलंब करावा असे आवहान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव यांनी केले ते मौजे नाथरा येथे विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
    सकाळी 10 वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होऊन प्रबोधनाचा कार्यक्रम उत्साहामध्ये घेण्यात आला. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण गावचे उपसरपंच श्रीकांत मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष हनुमंतजी वाघमारे सर, भारतीय बौद्ध महासभेच्या शहराध्यक्ष आदरणीय प्रजावतीताई कांबळे, समता सैनिक दलाचे डॉ. स्वप्नी
ल महाळंगीकर, समता सैनिक दलाचे यशपाल बचाटे, समता सैनिक दलाचे जयपाल पांचांगे, सुभाषजी मुंडे हे होते.
               अध्यक्षीय समारोपात मिलिंद घाडगे यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजाला पुढे नेण्याचे काम केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमामुळेच आज समाज वैभवाचे जीवन जगत आहे. ज्या काळामध्ये खायला भाकर नव्हती त्या काळात प्रचंड उत्साहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघायची. आणि त्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये बाबासाहेबांचा जयजयकार करणाऱ्या प्रचंड घोषणा परिसर दणाणून टाकायच्या बाबासाहेबांचे अनुयायी वेगवेगळ्या कलाकुसर दाखवायचे लेझीम पथक असायचे हलक्या, ढोल, बँजो अशा प्रकारचे कानाला चांगले वाटावे असे सुमधुर वाद्य मिरवणुकीमध्ये वाजवल्या जायचे. परंतु आजची मिरवणूक वेगळ्या पद्धतीने भरकटत जाते की काय अशी भीती वाटू लागलेली आहे. 
  डीजेच्या कर्कश आवाजापुढे आजचा तरुण बाबासाहेबांच्या जयघोष करणाऱ्या घोषणा विसरून गेला आहे. हे घातक असून बाबासाहेबांच्या जयंतीचा उद्देशच नाहीसा होत आहे. यावर चिंतन मनन होणं अत्यंत गरजेचे आहे मिरवणुकीचा बिभत्सपणा जाऊन मिरवणुकीमध्ये सुमधुर वाद्य यायला हवे असे मत मिलिंद घाडगे यांनी व्यक्त केले.
  याप्रसंगी हनुमंत जी वाघमारे, प्रजावतीताई कांबळे,डॉक्टर स्वप्नील महाळंगीकर, यशपाल बचाटे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिम शाहीर प्रबोधनकार राहुल जी सूर्यवंशी सर यांनी तर आभार गौतम आदमाने यांनी मांडले. कार्यक्रम करण्यासाठी संजीवन पैठणी, भगवान बनसोडे, आकाश तूप समुद्रे, दयानंद बनसोडे, सुयोग किरवले,  विद्याकर हरभडे, सुनील किरवले, पंढरीनाथ आरबडे, अशोक वावळे, विमलताई शिंदे, कविताताई  पैठणे, संगीताताई सूर्यवंशी, रेखाताई वाघमारे, इंदुताई हरबडे, पंकजाताई किरवले इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिला, पुरुष, बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने